जिल्हा रोलर स्केट बास्केटबॉल असोसिएशनतर्फे चौथी राज्य रोलर स्केट बास्केटबॉल चॅम्पियनशिप 13 नोव्हेंबर रोजी सोमलवार शाळेत आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ललिता पब्लिक स्कूलच्या 17 वर्षांखालील मुलांनी यवतमाळच्या संघाचा 0-16 असा पराभव करून प्रथम क्रमांक पटकावला. कुणाल गुरुपंच, अंशुल कुंभारे, कार्तिक हरिणखेडे, गोजील खान, देवांश कांबडे या मुलांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीने शाळेचे नाव उंचावले.
14 वर्षांखालील मुलांच्या संघात तक्षित धनकुटे, रौनक रहांगडाले यांनी उत्कृष्ट कामगिरी करत आपल्या संघाला तिसऱ्या क्रमांकावर आणले. शाळेच्या संचालिका सौ.चेतना टांक व मुख्याध्यापिका सौ.मंजिरी जोशी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून तामिळनाडू येथे होणाऱ्या स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.