वाघाच्या अवयवांसह 2 तस्करांना अटक

0

नागपूर व भंडारा वनविभागाची संयुक्ती कारवाई


नागपूर. खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे नागपूर व भंडारा येथील वन विभागाच्या पथकांनी (forest department teams) शनिवारी भंडारा जिल्ह्यातील नाकडोंगरी वन परिक्षेत्रातील गोबरवाही (Gobarwahi in Nakdongri forest area of Bhandara district) येथे सापळा रचून वन्य जीवांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या दोघांना अटक (Two arrested for smuggling wildlife organs) केली. त्यांच्याकडून मोठ्याप्रमाणावर वाघाचे अवयव जप्त करण्यात आले. त्यात 15 वाघनखे, 3 सुळे दात, 10 जोडी दात (दाढ), 5 किलो हाडांचा समावेश आहे. संजय श्रीराम पुस्तोडे (41) रा. चिखला माईन्स व रामू जयदेव ऊईके (33) रां. असलपणी अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. नाकडोंगरी वन परीक्षेत्रातून वन्य प्राण्यांच्या अवयवांची तस्करी होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानुसार वन विभागाने तस्करांवर लक्ष केंद्रित केले होते. खबरेही पेरण्यात आले होते.
खबऱ्यांकडूनच आरोपी वाघासह अन्य वन्यजीवांच्या अवयवांची मागणी नुसार विक्री करीत असल्याची सूचना मिळाली होती. त्यानुसार वन विभागचे पथक दोन्ही आरोपींच्या हालचालींवर लक्ष ठेवून होते. त्यानंतरच गोबरवाही भागात सापळा रचण्यात आला. आरोपी साहित्यासह तिथे पोहोचताच अचानक धडक देऊन मुसख्या आवळण्यात आल्या. त्यांच्याकडून मोठ्या संख्येने वाघनख्ये, वाघाचेच दात व हाडे जप्त करण्यात आली.


नागपूरचे मुख्य वनसंरक्षक रंगनाथ नाईकडे, उप वनसंरक्षक भारत सिंह हाडा, उप वनसंरक्षक राहुल गवई यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेल्या या कारवाईत विभागीय वन अधिकारी दक्षता पी. जी. कोडापे, उमरेडचे सहायक वन संरक्षक नरेंद्र चांदेवार, सहायक वन संरक्षक संदीप गिरी, साकेत शेंडे, संजय मेंढे, पी. एम. वाडे, वनरक्षक तावले, पडवळ, जाधव, शेंडे आदींचा समावेश होता. साकेत शेंडे पुढील तपास करीत आहेत.

बनावट ग्राहक पाठवून


थोडाही सुगावा लागल्यास आरोपी पळून जाण्याची किंवा त्याच्याकडील साहित्य नष्ट करण्याची शक्यता होती. यामुळे आरोपींबाबत माहिती मिलाल्यानंतर त्यांच्यावर पळत ठेवण्यात आली. त्यात वन्यजीवांची अत्यंत गोपनीयरित्या विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले. अवश्यक ती सर्व खबरदारी घेत बनावट ग्राहकांना आरोपींकडे पाठविण्यात आले. ग्रहकबणून दोन दिवस खलबते सुरू ठेवली गेली. त्याचवेळी सापळाही रचला गेला. शनिवारी दोन्ही आोपींचीधरपकड केल गेली.

फिश आणि चिप्स, टमाटर सॉस आणि बरितो रेसिपी | How to make Fish & Chips Recipe| Epi 25| Shankhnaad News

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा