वाघाने दुचाकीस्वारांवर घेतली झडप

0

कमलापूर भागात दहशत


गडचिरोली. जिल्ह्यात वन्यप्राणी आणि मानव संघर्ष शिगेला पोहोचला (Human-wildlife conflict has reached its peak) आहे. वाघाचे हल्ले वाढतच आहेत. अलिकडच्या काळात वाघाच्या हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अहेरी तालुक्यातील कमलापूर गावानजीक (Near Kamalapur village in Aheri taluka) वाघाने चक्क चालत्या दुचाकीवर झडप घेत हल्ला (tiger attacked the moving bike ) केला. नशीब बलवत्तर असल्याने दुचाकीवरील दोघे मित्र या हल्ल्यात थोडक्यात बचावले. वाघाने घडप घेताना त्याचा अंदाज चुकाला. यामुळे गोंधळलेला वाघ जंगलात निघून गेला. पण, या घटनेनंतर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. वाघासह बन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या घटना वाढतच आहेत. वन विभागाकडून केलेल्या उपाययोजना सपशेल अपयशा ठरताना दिसत आहे. वन विभागाने प्रभावी उपाययोजना करीत वन्य प्राण्यांकडून सुरू असलेल्या हैदोसाला लगाम लावण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.


अहेरी तालुक्यातील रेपनपली आणि कमलापूर परिसरात काही दिवसांपासून वाघाचा वावर असल्याची चर्चा होती. याभागात ग्रामस्थ एकटे फिरणे टाळले जात आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीच्या सुमारास सुधीर रंगुवार आपल्या मित्रासह कमलापूर- मोदुमोडगू मार्गावरून दुचाकीने जात असताना झुडपात दडून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर झडप घेतली. यात दुचाकीच्या मागच्या भागाला वाघाचा पंजा लागला. चालकाने कसेबसे वाहन सावरले. पण, वाघाच्या हल्ल्यामुळे दोघांचीही पाचावर धारण बसली. घाबरलेल्या स्थितीतच दोघा मित्रांनी कसेबसे गाव गाठून आपबिती कथन केली. यप्रकरणी कमलापूर वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्यांना वाघाच्या पंज्याचे ठसे आढळून आले. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण आहे. वाघाची दहशत असलेल् भागात जाणे नागरिक टाळत आहेत. भीतीपोटी जंगालालगत शेत असणारे शेतकरीही शेतीवर जाणे टाळत आहेत. खरीपाचा हंगाम पावसाने गेला. त्यात वाघाच्या भीतीमुळे रब्बीचे पिक घेणेही अडचणीचे ठरते आहे. शेतकऱ्यांनी गुजराण भागवावी तरी कशी असा ग्रामस्थांचा प्रश्न आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त लावावा. त्यांना जंगलांमध्ये रोखण्यासाठी उपाययोजना करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे.