वाघापाठोपाठ बिबट्याचीही दहशत
बनवाडीत चर्चेला उधाण, वनविभागाची धावपळ

0


नागपूर. गेल्या महिनाभारापासून नागपूर शहरालगतच्या (Near Nagpur city ) पेवठा, बनवाडी, रूई, पांजरी, खरसोली, सालई, गोधनी, हुडकेश्वर आदी गावांमध्ये अनेकांनी वघाचे दर्शन होते आहे. या वाघाने दोन गावांत बैलावर हल्लाही केला. वाघाची दहशत कायम असतानाच आता बनवाडीत काहींना बिबट दिसल्याचा (While the terror of the tiger is still there, now some people have seen a leopard in Banwadi) दावा केला जात असतून त्यामुळे चर्चेचे पेव फुटले आहे. या माहितीमुळे वनविभागाची धावपळ सुरू झाली आहे. बुधवारी दुपारी 2 च्या सुमारास वन कर्मचाऱ्यांना पेवठा गावातील आशिष मेश्राम व बालू सिंग यांनी फोन केला. दोघांनीही पेवठा ते बनवाडी मार्गावर बिबट दिसल्याची माहिती दिली. वन कर्मचाऱ्यांनी बिबट दिसलेल्या ठिकाणी धाव घेतली. पायाचे ठसे शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र, कुठेही ठसे मात्र दिसले नाही. अलीकडेच जामठा परिसरातून एका बिबट्याला जेरबंद करण्यात आले होते. वाघ आणि बिबट्याच्या दहशतीने शेतकऱ्यांनी शेतातील कामांकडे दुर्लक्ष केले असून त्यांचे नुकसान होते आहे.


गोंदियातील नवेझरीतही वाघाची दहशत


नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांपाठोपाठ आता गोंदिया जिल्ह्यातही वाघाची दहशत आहे. गडचिरोली जिल्ह्यात 40 च्या वर वाघ आहेत. तर चंद्रपूर जिल्ह्यात 100 च्यावर वाघ आहेत. गोंदिया जिल्ह्यातही वाघांचा वावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या वाघाचा शोध घेऊन त्यावर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाचे गस्ती पथक गावात दाखल झाले आहे. जंगलात वा शेतात जायचे असल्यास आधी वन विभागाला कळवावे. एकट्या दुकट्याने जंगलात जाऊ नये असे आवाहन वन विभागाने केले आहे. तिरोडा तालुक्यातील जंगलव्याप्त नवेझरी गावात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गावाला लागून व्याघ्र प्रकल्प असल्यामुळे तेथील वन्यजीवांचा नेहमीच गावाच्या आजूबाजूला वावर असतो. गेल्या काही दिवसांपासून शेतशिवारात वाघाच्या डरकाळ्या ऐकू येत असून अनेकांना वाघ दिसल्याचे लोक सांगत आहे. सध्या सर्वत्र शेतीची कामे सुरू असून शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वन विभागाचे पथक गावात दाखल झाले असून गस्त वाढवण्यात आली आहे. वाघाच्या दहशतीमुळे सायंकाळ होताच परिसरात शुकशुकाट दिसून येतो.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा