वेटलिफ्टिंग स्पर्धेत आहाना कपुरियाला सुवर्णपदक

0

नागरकोइल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत निवड

नागपूर :वेटलिफ्टिंग फेडरेशन महाराष्ट्रतर्फे नुकत्याच आयोजित महाराष्ट्र राज्य वेटलिफ्टिंग स्पर्धेत एकूण 160 किलो वजनी गटात १७ वर्ष वयोगटात आहाना प्रवीण कपुरिया हिने सुवर्ण पदक प्राप्त केले. तिच्यावर सर्व स्‍तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. डिसेंबर अखेरीस आणि जानेवारी २०२३ च्या पहिल्या आठवड्यापर्यंत नागरकोइल येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत तिची निवड झाली आहे.


आहाना ही आरटीओ अधिकारी प्रवीण कपुरिया व नीलिमा कपुरिया (उद्योजिका) यांची मुलगी आहे. सेंटर पॉइंट स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या आहाना प्रवीण कपुरिया हिने काही दिवसांपूर्वी नागपुरातील मानकापूर स्टेडियममध्ये झालेल्या डिएसओ स्पर्धा जिंकल्या. यावेळी तिला सुवर्णपदक मिळाले होते. याशिवाय 12 डिसेंबर ते 15 डिसेंबर 2022 दरम्यान होणाऱ्या राज्य शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धेत ती खेळणार आहे. यावर्षी राष्ट्रीय स्पर्धेत नवा विक्रम प्रस्थापित करण्याचे तिचे स्वप्न आहे. सेंटर पॉइंट स्कूलतर्फे गेल्या वर्षभरापासून संतोष सिंहासने आणि विशाल लक्ष्मण बायकुडे यांनी तिला प्रशिक्षण दिले आणि उत्कृष्ठ सराव करून घेतला.

ब्लूबेरी मफीन्स आणि सॉल्टेड कॅरेमल सॉस रेसिपी |Blueberry Muffin & Salted Caramel Sauce Recipe|Epi 45

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा