शाळेत आरोग्य शिबिरादरम्यान युवा डॉक्टरचे विद्यार्थीनींशी गैरवर्तन परडीतील नामांकित शाळेत प्रकार : पोलिसात तक्रार दाखल

0

नागपूर. शहरातील (Nagpur city) पारडी परिसरातील (Pardi area ) एका नामांकित शाळेत विद्यार्थी -विद्यार्थिनींसाठी आयोजित आरोग्य शिबीरात एका युवा डॉक्टरने काही विद्यार्थिनींशी गैरवर्तन (young doctor misbehaved with some female students) केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर पालकांनी डॉक्टराविरोधात पोलिस ठाण्यात तक्रार (parents filed a complaint against the doctor in the police station) दिली आहे. बुधवारी हे शिबिर घेण्यात आले होते. त्यात विद्यार्थ्यांसह विद्यार्थिनींची तपासणी झाली. या तपासणीनंतर काही विद्यार्थिंनी शाळेच्या पटांगणात या प्रकाराबाबत कुजबूज करीत होत्या. त्यामुळे एका शिक्षिकेने आणि पालकांनी विद्यार्थिंनींना विश्वासात घेऊन विचारपूस केली. त्यामुळे डॉक्टरने केलेल्या गैरप्रकाराची वाच्यता झाली. त्यामुळे शाळेतील काही पालक संतप्त झाले. त्यांनी पारडी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि पोलिसांकडे तक्रार केली.


तरुणी, युवती, महिला असुरक्षित असल्याच्या अनेक घटना सातत्याने पुढे येत असतात. शाळेत जाणाऱ्या विद्यार्थिनीसुद्धा असुरक्षित असल्याचे अनेक घटनांनी असुरक्षित केले आहे. डॉक्टरने एखाद्या शाळेत जाऊन वैद्यकीय तपासणीच्या नावाखाली विद्यार्थिनींसोबत गैरवर्तन केल्याची प्रकरणे तशी क्वचितच. शिक्षकांच्या देखरेखित वैद्यकीय शिबिर होत असल्याने विद्यार्थिनीही बिनधास्त होत्या. डॉक्टरच्या मनात काही काळेबेरे असल्याची शंकाही त्यांच्या मनात नव्हती. तारुण्याच्या उंबरठ्यावर नुकतेच पाऊल ठेवलेल्या या विद्यार्थिनींना प्रारंभी तपासणी करीत असताना डॉक्टर चुकीचे वागत असल्याची केवळ शंकाच आली. आपण चुकीचा विचार करीत असल्याचे समजून त्या गप्प राहिल्या. बाहेर आल्यानंतर मात्र त्यांच्यात कुजबूज सुरू झाली. ही कुजबूज शिक्षिकेच्या कानापर्यंत पोहोचली. त्यांनी मुलींची मनोदशा लक्षात घेत त्यांची आस्थेने विचरपूस केली. अनेकींना सारखाच अनुभव असल्याने पालकांसोबत चर्चा केली. पालकांनीही विद्यार्थिनींसोबत बोलून खात्री करून घेतली. त्यानंतरच पालक एकत्रितपणे ठाण्यात पोहोचले आणि तक्रर दिली.


प्रकरण गंभीर असल्यामुळे अप्पर पोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी पारडी ठाण्यात पोहचले. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात तक्रारीबाबत चर्चा सुरू होती. डॉक्टरांवर आरोप असून याप्रकरणी शहानिशा करण्यात येत आहे. सर्व बाबतीत चर्चा झाल्यानंतर निर्णय घेण्यात येईल, अशी प्रतिक्रिया रेड्डी यांनी दिली.

*आलू पराठा आणि कटलेट्स रेसिपी ट्रान्सजेंडर मोहिनी सोबत शंखनाद कीचनमध्ये | Epi 39| Aloo Paratha Recipe*

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा