शिंदे गटाच्या गुवाहाटी भेटीची तारीख ठरली, कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार

0

मुंबईः शिंदे गटाचा जूनमधील गुवाहाटी दौरा प्रचंड गाजला व त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. आता शिंदे गट मुख्यमंत्र्यांसह पुन्हा एकदा गुवाहाटीच्या दौऱ्यावर जायला निघाला आहे. या दौऱ्याची तारीखही ठरली असून कामाख्या देवीच्या दर्शनासाठी हा दौरा असणार आहे. 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीच्या दर्शनाला जाणार आहेत, असे सांगण्यात येत आहे. सत्तांतराच्या काळात ज्या ज्या व्यक्तींनी मदत केली, अशा व्यक्तींना शिंदे गट भेटून त्यांचे आभार मानणार आहे. या दौऱ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आसामचे राज्यपाल, मुख्यमंत्री तसेच पोलिस आयुक्तांसारख्या महत्त्वाच्या व्यक्तींना भेटणार असल्याची माहिती आहे. यासाठी आमदारांना पूर्वसूचना देण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


मागील महिनाभरापासून शिंदे गटाच्या या दौऱ्याची चर्चा सुरु होती. आता या दौऱ्याचे तारीख पुढे आली आहे. 21 नोव्हेंबरला मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन पुन्हा गुवाहाटी येथे जाणार आहे. गुवाहटीला मुख्यमंत्री सर्व आमदारांसह कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. कामाख्या देवीचे दर्शन झाल्यानंतर एका खास पूजेचे आयोजन करण्यात आले आहे. सत्तांतरणाच्या काळात मुख्यमंत्र्यांनी जी पूजा केली, त्याच प्रकारची ही खास पूजा राहणार असल्याचे सांगण्यात आले. हा दौरा एकच दिवसाचा असून दौऱ्यासाठी पूर्वतयारी सुरू करण्यात आली असून सर्व आमदारांना सूचना देण्यात आल्या आहेत. सत्तांतराच्या काळात मुख्यमंत्र्यांनी कामाख्या देवीच्या दर्शनाला जाऊन मुख्यमंत्री झाल्यानंतर पुन्हा दर्शनाला येईन, असे सांगितले होते. त्यामुळेच मुख्यमंत्री सर्व आमदारांना घेऊन कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहे.

*नागपुरी गोळाभात रेसिपी | Nagpur Special Gola Bhat Recipe | Episode 33 | Shankhnaad News*

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा