शिंदे गट गुवाहाटीला रवाना
गुवाहाटीत जोरदार बॅनरबाजी

0

मुंबई. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) सोबत असणारे आमदार, खासदारांसह गुवाहाटीकडे (Guwahati) मुंबई विमानतळावरुन (Mumbai Airport ) गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाले आहेत. सर्वजण कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. मोहित कंबोज यांच्यासह भाजपचे दोन नेतेही सोबत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या स्वागतासाठी गुवाहाटीत जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. तीन महिन्यांपूर्वी शिवसेनेतील सर्व बंडखोर गुवाहाटीला गेल्याच्या आठवणी पुन्हा ताज्या होताना पाहायला मिळत आहेत. शिंदे गटाचे आमदार आज पुन्हा एकदा गुवाहाटीमध्ये दाखल होत असून या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. शिंदे गटातील ६ आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारली असल्यानेही तर्क-वितर्क लढवले जात आहेत.


शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी व्हाया सुरत गुवाहाटी गाठले होते. तिथे त्यांच्यासह सर्व आमदारांनी कामाख्या देवीचे दर्शन घेतले होते. तेव्हा कामाख्या देवीला केलेला नवस फेडण्यासाठी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या सगळ्याच आमदारांसह गुवाहाटीला आज जात आहेत. मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात गुवाहाटीची चांगलीच चर्चा आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्व प्राप्त झाले. मुख्यमंत्री गुवाहाटी दौऱ्यात कामाख्या देवीचे दर्शन घेणार आहेत. त्याशिवाय आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व शर्मा यांच्याही भेट घेणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या या दौऱ्यासाठी काही महिने आधीपासूनच तयारी सुरू करण्यात आली होती.


कामाख्या देवीचे दर्शन घेण्यासाठी गुवाहाटीला जात आहोत. याचा आनंद वाटत असल्याची प्रतिक्रिया आमदारांनी प्रसिद्धी माध्यमांसोबत बोलताना दिली. दोन तीन महिन्यात सरकारने चांगले काम केले आहे. आमच्या मागे देवीचे आशिर्वाद असल्याचे आमदारांचे म्हणणे आहे.


ठाकरे गटाच्या आमदारांनाही लवकरच दर्शनासाठी घेऊन जाऊ


देवाचं दर्शन घेणे चुकीचे नाही. विरोधकांकडे काही मुद्दे शिल्लक राहिले नाहीत, त्यामुळ ते टीका करत असल्याचे मत मंत्री दादा भुसे यांनी व्यक्त केले. ठाकरे गटात उरलेल्या आमदार आणि खासदारांनाही लवकरच आम्ही कामाख्या देवीच्या दर्शनासाठी घेऊन जाऊ असे वक्तव्य खासदार भावना गवळी यांनी केले. ते आता आले असते तर त्यांना आम्ही घेऊन गेलो असतो. पण पुढच्या वेळेस आम्ही त्यांनी गेऊन जाऊ असे गवळी म्हणाल्या.

*बेक मँगो योगर्ट आणि बनाना वॉलनट केक | Bake Mango Yogurt & Banana Walnut cake |Epi 40|Shankhnaad News*

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा