मुंबईः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे मुंबईतील स्मारक राज्य सरकारने ताब्यात घ्यावे व स्मारकाची देखभाल राज्य सरकारने देखभाल समितीमार्फत करावी, अशी मागणी भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी (The state government should maintain the memorial of Shiv Sena Pramukh Balasaheb Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. या स्मारकाच्या देखभालीसाठी सरकारने समिती नेमावी व त्या समितीत ठाकरे कुटुंबातील एखाद्या सदस्याची नेमणूक करावी, असा सल्लाही आमदार लाड यांनी दिला आहे. स्मारकाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य महाराष्ट्रातच नाही तर देशभर पोहोचवले पाहिजे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली आहे. आमदार लाड (BJP MLA Prasad Lad) यांनी केलेल्या या मागणीचे काय राजकीय पडसाद उमटतात व राज्य सरकार त्यावर काय निर्णय घेते, याकडे आता लक्ष लागलेले आहे.
आमदार प्रसाद लाड म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक कुठल्या कुटुंबाचे नाही.
त्यामुळे ते राज्य सरकारने ताब्यात घेतले पाहिजे. त्याच्या देखभालीची जबाबदारी राज्य सरकारने स्वीकारली पाहिजे. देखभालीसाठी राज्य सरकारने समिती नेमावी व त्या समितीत ठाकरे कुटुंबातील एका व्यक्तीचा समावेश करावा, असेही आमदार लाड म्हणाले. बाळासाहेबांचे स्मारक हे महाराष्ट्राचे स्वाभीमान स्मारक व्हावे, स्मारकाच्या माध्यमातून बाळासाहेब ठाकरे यांचे कार्य महाराष्ट्रातच नाही तर देशभर पोहोचावे, अशी अपेक्षाही आमदार लाड यांनी या मागणीत व्यक्त केली आहे.\
पनीर बटर मसाला आणि आटा समोसा | Paneer Butter Masala & Atta Samosa Recipe | Epi 34 | Shankhnaad News