शेतकरी संघटनेचे नेते तुपकर यांचे आंदोलन मागे, मुख्यमंत्र्याशी चर्चेतून तोडगा

0

मुंबई : स्वाभीमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Swabhimani Shetkari Sanghatana Leader Ravikant Tupkar) यांनी अरबी समुद्रातील जलसमाधी आंदोलन मागे घेतले आहे. सरकारने आपल्याला मागण्यांबाबत आश्वासन दिले असून सरकारने शब्द फिरलव्यास पुन्हा एकदा आंदोलनाचे हत्यार उपसले जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चा झाली असून शेतकऱ्यांची वीज तोडणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी, या मागणीसाठी तुपकर यांनी आंदोलनाची घोषणा केली होती.


रविकांत तुपकर यांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, बऱ्याचशा मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. ज्या मागण्या आता मान्य करण्यात आल्या नाहीत त्यासाठी थोडा वेळ लागेल, असे मुख्यमंत्री म्हणाले. बऱ्याचअंशी आमचे समाधान झाल्याने आम्ही आज होणारे हे आंदोलन मागे घेत आहोत. पण राज्य सरकारने जर शब्द फिरवला तर मात्र पुन्हा एकदा आंदोलनाचे शस्त्र उपसलं जाईल. काही मागण्यासंबंधी एक शिष्टमंडळ केंद्र सरकारला जाऊन भेटणार असल्याचे ते म्हणाले. कृषी कर्जाला सीबिलची अट लावली आहे, ती अट राज्यात लावण्यात येणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा