श्रध्दा या मुलीच्या क्रूरपणे झालेल्या दुर्दैवी हत्येमुळे एक अत्यंत जळजळीत सत्य जगासमोर, समाजासमोर आले. माणूसकीला काळिमा फासणा-या अशा अनेक घटना घडत असूनही असंख्य मायबापांचे डोळे उघडत नाहीत हा दैवदुर्विलासच म्हणावयास हवा.
स्वधर्मीयांवर झालेल्या अन्यायासाठी, अत्याचारा साठी आम्ही नेहमी काही तरी कारणं शोधत असतो. पण आपल्याच स्वतःच्या चुकां आपल्याला दिसत नाहीत. आमचे रक्त पेटून उठणे तर केव्हाचेच बंद झाले आहे. आपल्या रुढी परंपरा, रितीरिवाज पाळणे यात काही हिंदूंनाच कमीपणा वाटतो. मग मुला मुलींवर संस्कार होणार कसे ? त्यांना स्वधर्माबद्दल आस्था वाटणार कशी ? समाजाच्या एकीबद्दल तर न बोललेले चांगले. स्वतःच्या घरात आग लागली असताना स्त:च्या समाजातील इतरांना, इतरांच्या पापभिरू आया बहिणींना वाईट म्हणून धन्यता मानणारे टोमणे बहाद्दर षंढ सुध्दा आपल्याच समाजात दिसतात.
तारुण्य सुलभ भावना फक्त हिंदू मुलींनाच असतात काय ? ईतर धर्मीयांच्या किती मुली हिंदू मुलांवर भाळतात ? हिंदू मुलींच्या तुलनेत शेकडा १ टक्काही नाही. ईतर समाज आपल्या मुलींना तशी मुभा मिळूच देत नाहीत. त्यांच्या मुली हिजाबसाठी समाजाशी जगाशी भांडतात. आणि आमच्या मुली साधी टिकली लाव म्हटले तरी समाजाविरुद्ध भांडतात, महिला आयोगात जातात. याबाबत ईतर धर्मियांकडून सर्वच नाही पण काही गोष्टी नक्कीच शिकण्यालायक आहेत. एक बोट समोरच्याकडे दाखवताना चार बोटे आमच्याकडे असतात हे आपल्या समाज बांधवांना कधी कळणारच नाही काय? चिंतनीय विषय आहे. कुठे जात आहोत आपण ? हा संस्कारांच्या अभावाचा दोष नाही काय?
स्वातंत्र्य फक्त हिंदू मुलींनाच हवे आहे काय ? स्वातंत्र्याच्या फार चुकीच्या कल्पना करुन घेतल्या आहेत बहुतांश हिंदू समाजाने. आम्ही काय वाट्टेल ते करु, पण आई वडिलांना, समाजाला त्याबद्दल काही बोलण्याचा, समजावून सांगण्याचा अधिकार नाही, अशी ठाम समजूत करुन घेतली आहे अनेक हिंदू मुला मुलींनी. अत्याचाराच्या घटनांही त्यामुळे, मग ती श्रद्धा असो वा काश्मीर फक्त हिंदू समाजावरच घडलेल्या दिसून येतात. हा अत्याचार प्रासंगिक नव्हे तर एका योजनाबध्द कटाचा भाग असतो.
सर्वधर्मसमभाव हा अनमोल विचार तर उपहासाचा विषय करुन ठेवला आहे अनेकांनी. हिंदूंनी आपल्याच हिंदू धर्माला, चालीरितींना, रुढी परंपरांना वाईट ठरवून, ईतर धर्मियांपुढे लोटांगण घालणे म्हणजे सर्वधर्मसमभाव अशी पक्की धारणा करुन घेतली आहे काही लोकांनी. हिंदू म्हणजे फक्त सवर्ण असा एक भ्रामक पण अत्यंत जहरी विचार समाजात पसरविण्याचा धोकादायक खेळ काही भ्रष्ट हिंदूंद्वारे सुरू आहे. राजकीय स्वार्थासाठी तर या गोष्टीचा सर्वोपरीने वापर करून घेण्याचा प्रयत्न करण्यात येतो असे दिसते.
देशातील सध्याच्या राजकीय परिस्थीतीमुळे तर काही लोकांना वेडेपीसे बनवून सोडले आहे. भारत जोडण्यापेक्षा हिंदूंना तोडण्याचे काम सुरू आहे. दुस-यांना वेडेपीसे बनू द्यायचे कि आपण स्वतः वेडे बनायचे एवढे जरी शहाणपण आपल्या समाजात आले तरी गंगेत घोडे न्हाले असे म्हणायचे….!!
मुकुंद सरमुकद्दम.