संघ कार्यालय बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा तो महापारेषणचा अभियंता

0


नागपूर. उपराजधानीतील रेशीमबाग येथील संघाचे ( RSS ) कार्यालय आणि रेशिमबाग (Reshimbag) मैदानाजवळील भट सभागृह बॉम्बने उडवून देण्याची धमकी (Bomb threat) निनावी पत्राद्वारे देण्यात आली आहे. पत्रावर बॉम्बचे चित्र लावून असा प्रकारचा स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी कसून शोध घेतला. त्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. हे पत्र महापारेषणच्या कार्यकारी अभियंत्याने (Executive Engineer of Mahapareshan) पाठविल्याचे तपासात समोर आल्यानंतर सारेच बचकळ्यात पडले आहेत. पोलिसांनी या अभियंत्याला ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. सध्यातरी मानसिक स्थिती ठिक नसल्याची सबब पुढे करीत अभियंत्याने बचावात्मक पवित्रा घेतला आहे. त्याचवेळी वेगवेगळ्या शक्यताही समोर येत आहेत. पोलिस तपासातूनच नेमके कारण स्पष्ट होऊ शकणार आहे.


शहरातील सक्करदरा पोलिस ठाण्यात २५ नोव्हेंबर रोजी हे पत्र मिळून आले होते. त्यामध्ये संघाचे रेशीमबाग येथील कार्यालय, रेशीमबाग जवळील भट सभागृह या ठिकाणी धमाका करु अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली होती. सोबतच एक बॉम्बचे चित्रही त्या पत्रावर रेखटण्यात आले होते. निनावी पत्र मिळाल्यानंतर पोलिस दलात खळबळ उडाली. सक्करदरा पोलिस स्टेशनचे विशेष पथक स्थापन करुन गेले काही दिवस धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यात येत होता. सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी नागपूरच्या झिरो माइल येथील पोस्ट ऑफिसमध्ये निनावी पत्र पेटीत टाकणाऱ्या एका व्यक्तीला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी करण्यात आली आणि त्या व्यक्तीने याबाबत कबुली दिली. हे धमकीचे निनावी पत्र मीच लिहिले आहे असे त्याने कबूल केले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


सध्या पोलीस अभियंत्याची सखोल चौकशी करत असून मानसिक स्थिती योग्य नसल्यामुळे मी असे केल्याचे तो चौकशीत सांगत असल्याची माहिती आहे. दरम्यान, ज्या दिवशी स्फोट घडवू असे त्या धमकीचे पत्रात लिहिण्यात आले होते, त्याचदिवशी भट सभागृहात महापारेषणचा एक कार्यक्रम होणार होता. तो कार्यक्रम होऊ द्यायचा नाही म्हणून ही निनावी धमकी देण्यात आली होती का, असा संशय पोलिसांना आहे. पोलिस त्या दृष्टीने तपास करत आहेत. त्यामुळे संघाचे कार्यालय उडवायचे होते की, महापारेषणचा कार्यक्रम उधळून लावयाचा होता, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.

ब्लूबेरी मफीन्स आणि सॉल्टेड कॅरेमल सॉस रेसिपी |Blueberry Muffin & Salted Caramel Sauce Recipe|Epi 45

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा