संविधान दिवस व आम आदमी पार्टीचा स्थापना दिवस साजरा करण्याकरिता आप नागपूरने काढला मार्च

0

संविधान व संविधानिक संस्था वाचवण्याकरिता आम आदमी पार्टी नागपूरने काढला पैदल मार्च

दहा वर्षा आधी 26 नोव्हेंबर 2012 संविधान दिन या दिवशी आम आदमी पार्टीची स्थापना झाली होती. या अनुषंगाने आम आदमी पार्टी नागपूरने आज संविधान दिना दिवशी फ्रीडम पार्क झिरो माइल मेट्रो स्टेशन पासून संविधान चौकापर्यंत मार्च काढला हा मार्च महाराष्ट्र संयोजक रंगाराचुरे यांच्या नेतृत्वात काढण्यात आला. यावेळी प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य सचिव धनंजय शिंदे, कोंकण संयोजक डॉ फैझी, राज्य आयटीसी प्रमुख कुसुमाकर कौशिक, विदर्भ संयोजक देवेंद्र वानखेडे, राष्ट्रीय परिषद सदस्य अमरीश सावरकर, राज्य सहसचिव अशोक मिश्रा, नागपूर संयोजक कविता सिंगल, नागपूर संघटन मंत्री शंकर इंगोले, नागपूर सचिव भूषण ढाकुलकर, नागपूर उपाध्यक्ष डॉ शाहिद अली जाफरी हे प्रामुख्याने उपस्थित होते.

देशात असणारी सरकार ही दिवसण दिवस नागरिकांचे मूलभूत अधिकार सीमित करीत आहे व त्यांचे हनन करीत आहे. देशाच्या लोक तंत्रावर आघात करता लोकतांत्रिक संस्थाना दिवसेंदिवस संपवण्याचा प्रयत्न होत आहे. देशातल्या सध्याच्या राजकीय परिस्थिती पाहता आज संविधान दिना दिवशी सर्व जाती, पंथ, धर्मांच्या लोकांनी सोबत येऊन संविधान विरोधी शक्तींशी लढण्याचा संकल्प करा – धनंजय शिंदे राज्यसचिव आप

देशात तापलेल्या महागाईमुळे जनता त्रस्त आहे व सरकारी संपत्तीचा बाजार या सरकारने लावून ठेवला आहे. ही सर्व परिस्थिती पाहता जनतेला रस्त्यावर उतरणे व लोकतांत्रिक माध्यमांद्वारे आपला रोश प्रकट करण्यासाठी या सरकारने बाद्य केली आहे. आम आदमी पार्टी ह्या देशातील लोकांचे मूलभूत हक्क व लोकतंत्र वाचवण्याकरिता संविधान दिनाच्या दिवशी संविधान बचाव मार्च काढत आहे.

आम आदमी पार्टीचा देह संविधानाला खऱ्या अर्थाने आत्मसात करून व आपल्या धोरणांद्वारे लोकांपर्यंत नेणे हा आहे. बाबासाहेबांनी सांगितलेला समानतेचा नारा खऱ्या अर्थाने आम आदमी पार्टीने त्यांच्या कार्य व धोरणाद्वारे लोकांपर्यंत नेला आहे. तो शिक्षणाचा समान अधिकार असो अथवा सर्वांकरीता दर्जेदार मोफत आरोग्य सेवा असो. या कार्यक्रमाला नागपूर जिल्ह्यातील विभिन्नभागातून कार्यकर्ते आले होते. यावेळी विधानसभा संयोजक रोशन डोंगरे, लक्ष्मीकांत दांडेकर, श्रीकांत कामडी, अजय धर्मे, आकाश कावळे, मनोज डफरे, विधानसभा संघटन मंत्री सोनू फटिंग, संतोष वैद्य, प्रभात अग्रवाल, प्रदीप पवनीकर, बालू बनसोड, विधानसभा सचिव सचिन पारधी, अमय नारनवरे, धीरज आघाशे, विशाल जयस्वाल, जॉय बांडारकर यांच्या सहकार्याने हा मार्च यशस्वी करण्यात आला. तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.