सर आली धावून सामना गेला वाहून!
क्रिकेटप्रेमींची निराशा, बुधवारच्या सामन्याकडे लक्ष

0

दिल्ली. भारत आणि न्यूझीलंड (India Vs New Zealand) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील (ODI cricket series ) दुसरा सामना पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. हॅमिल्टनच्या (Hamilton) मैदानावर आज सकाळपासून पाऊस पडत होता. सामना सुरू होण्यापूर्वी पाऊस थांबला असला तरी ओल्या मैदानामुळे टॉसला उशीर झाला. पावसाने सामन्यात प्रचंड व्यत्यय आणला. पहिल्या 4.5 षटकांनंतर पाऊस आला आणि नंतर काही तासांनंतर सामना पुन्हा सुरू झाला, जो 29-29 षटकांचा होता, परंतु 12.5 षटकांनंतर पावसाने खेळ खराब केला. पंच आणि सामनाधिकारी यांना सामना रद्द करण्यास भाग पाडले. अशा स्थितीत मालिकेचा निर्णय आता शेवटच्या सामन्याने होणार आहे. पण, विजयाच्या आशा आता मावळल्या आहेत.
सामना रद्द होण्यापूर्वी भारताने एक विकेट गमावून 89 धावा केल्या होत्या. शुभमन गिल 45 धावा करून नाबाद होता, तर सूर्यकुमार यादवने 25 चेंडूत 34 धावा करत गिलला साथ दिली. हा सामना रद्द झाल्यानंतर भारताला यापुढे मालिका जिंकता येणार नाही. किवी संघ 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडीवर आहे. मालिकेतील शेवटचा सामना 30 नोव्हेंबरला खेळवला जाणार आहे.


दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारताने आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये 2 बदल केले होते. शार्दुल ठाकूरच्या जागी दीपक चहर आणि संजू सॅमसनच्या जागी दीपक हुड्डाचा समावेश करण्यात आला होता. शेवटचा सामना ठाकूरला चांगलाच महागात पडला, तर ऑकलंडकडून सॅमसनने 38 चेंडूत 36 धावा केल्या. हॅमिल्टनमध्ये गिलने 21 चेंडूत 19 धावा केल्या, ज्यात 3 चौकार मारले. तर धवनने 8 चेंडूंचा सामना करत 2 धावा केल्या. गेल्या सामन्यात दोघांनी अर्धशतकी खेळी खेळली होती. सामन्यासह मालिका खिशात घालण्याच्या निर्णयासह भारतीय संघ मैदानात उतरला होता. भारतीय क्रिकेट रसिकांनाही मोठ्या आशा होत्या. पण, पावसाने त्यात खोडा घातला. खेळ थांबल्याने साऱ्यांचीच निराशा झाली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा