दीड महिन्यांपासून सुरू होते उपचार ; बालक दिनीच अंत्यसंस्कार
वर्धा. रात्रीच्या सुमारास कुटुंबीयांसोबत झोपी गेलेल्या बहीण अन् भावाला जहाल विषारी मण्यार सापाने दंश केला (Sister and brother were bitten by a venomous snake ) होता. ही घटना १९ सप्टेंबर रोजी गिरडनजीकच्या पेठ गावात (Peth village near Girad ) घडली होती. मागील दीड महिन्यांपासून चिमुकल्याची मृत्यूशी झुंज सुरू होती. नियतीच्या मनात नेमके काय, याची कुणालाही कल्पना नसली तरी मुलगा बरा होण्यासाठी सारेच मनोमन प्रार्थना करीत होते. पण, अखेर नियतीने डाव साधून त्याची झुंज अपयशी ठरविली. योगेश राजू नेहारे (१४) याची प्रकृती खालावल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या हृदयद्रावक घटनेने पेठ गावातील नागरिक शोकमग्न झाले असून, एकुलता एक मुलगा दगावल्याने नेहारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. बालक दिनीच बालकावर अंत्यासंस्काराची दुर्दैवी वेळ ओढवल्यान पंचक्रोशीत हळहळ व्यक्त केली जात आहे.
पेठ गावातील रहिवासी योगेश नेहारे आणि त्याच्या बहिणीला मण्यार या विषारी सापाने दंश केला होता. दोघांचीही प्रकृती नाजूक असल्याने त्यांना सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात दाखल केले होते. काही दिवसांनंतर योगेशला फुप्फुसाचा त्रास होत असल्याने त्याला नागपूर येथील रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. दिवस पुढे जात होते, तसे तो बरा होईल, याची उमेदही वाढत होती. त्यामुळे आत्पष्ठांसह गावकरीही योगेशच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होते. तो वाचावा अशा सदिच्छा व्यक्त केल्या जात होती. पण, मागील पाच ते सहा दिवसांपूर्वी डॉक्टरांनी हात टेकले. सर्व प्रयत्न आटोपले, आता मुलाला घरी घेऊन जाण्याची सूचना त्यांनी केली. त्यानु,र योगेशला घरी आणले गेले. कोणतातरी चमत्कार होईल आणि मुलगा उठून बसेल, असे सर्वांनाच वाठत होते. पण, त्याची प्रकृती हळूहळू ढासळतच राहीली. फुप्फुसात संसर्ग झाल्याने अखेर त्याची मृत्यूशी झुं