सावरकरविरोधी वक्तव्य राहुल गांधींना भोवणार, सावरकरांचे नातू पोलिस तक्रार करणार

0

मुंबईः भारत जोडो यात्रेवर असलेले काँग्रेसचे खासदार राहुल गांधी हे सातत्याने स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर टीका करीत आहेत. त्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त होत असतानाच सावरकरांबद्दल चुकीची विधाने केल्याप्रकरणी खुद्द सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे कॉंग्रेसचे खासदार राहुल गांधींविरोधात तक्रार दाखल करणार आहेत. (Ranjeet Savarkar to file Complaint against Rahul Gandhi) त्यामुळे आगामी काळात राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होईल, असे संकेत मिळत आहेत. सावरकरांबद्दल चुकीची विधाने केल्याप्रकरणी खुद्द सावरकरांचे नातू रणजीत सावरकर हे आज दादर पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे हे देखील जाणार आहेत अशी माहिती आहे.

काय वक्तव्य होते?
सावरकर हे केवळ दोन-तीन वर्षे अंदमानच्या तुरुंगात राहिले, असा जावईशोध राहुल गांधी यांनी लावला आहे. राहुल गांधी यांनी त्यांनतरही मुक्ताफळे उधळली आहेत. त्यानंतर त्यांनी इंग्रजांना माफीनामे पाठवायला सुरुवात केली. नंतरच्या काळात सावरकरांनी वेगळ्या नावाने स्वत:वर पुस्तक लिहले आणि आपण किती शूरवीर होतो, हे सांगितले. सावरकरांना इंग्रजांकडून पेन्शन मिळायची, ते इंग्रजांसाठी काँग्रेस पक्षाविरोधात काम करायचे, असे राहुल गांधी यांनी म्हटले.
राहुल गांधी मनोरुग्ण-आमदार भातखळकर
भाजपचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनी खासदार राहुल गांधी यांच्यावर सडकून टीका केली आहे. त्यांनी याबाबत ट्विट करत राहुल गांधी हा मनोरुग्ण आहे, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही, अशा शब्दात राहुल गांधी यांच्यावर टीका केली आहे. आमदार भातखळकर म्हणाले की, सावरकर समजण्या इतकी अक्कल राहुल गांधी या माणसामध्ये नाही. त्याला अंदमान पर्व समजणार नाही. त्याची उडी थायलंड पर्यंतच आहे. पांढऱ्या पावडरीचा परिणाम दुसरे काय, असेही भातखळकर म्हणाले. तुरुंगात सिगरेट फुंकण्यापासून बॅडमिंटन खेळण्यापर्यंत सर्व सोयी उपभोगणाऱ्या नेहरुंच्या पणतूला सावरकरांचा त्याग समजवावा तरी कसा? अशा शब्दात आमदार अतुल भातखळकर यांनी टीका केली आहे. तर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओवरूनही राहुल गांधींवर टीका केली आहे.