सीएम आणि मंत्र्यांच्या डोळ्यात धूळफेक: प्रवीण महाजन यांचा आरोप

0

नागपूर: ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, ( Dr. Praveen Mahajan, Water Researcher ) जलअभ्यासक डॉ प्रवीण महाजन यांनी या एकंदर प्रकरणावर ( Shankhanad News ) ‘शंखनाद’ न्यूज प्रतिनिधींशी बोलताना तीव्र संताप व्यक्त केला. अधीक्षक अभियंता, कार्यकारी अभियंता, मुख्य अभियंता यांचाच विचार केला तरी तीनशेच्या घरात ही संख्या असताना मोजक्याच अधिकाऱ्यांची नावे घेणे हा प्रकार सहज होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री ( Devendra Fadnavis ) देवेंद्र फडणवीस यांनाही यात अंधारात ठेवले गेले इतकी अधिकाऱ्यांची हिंमत वाढली. आगामी अधिवेशनात निश्चितच हा विषय चर्चेला येणार आहे. श्रेयवाद असू शकतो मात्र प्रकल्पाचे राजकारण व्हायला नको, अधिकाऱ्यांनी आपलेच काम करावे असे परखड मत मांडले. या प्रकाराने जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना देखील दुःख झाले याकडे त्यांनी लक्ष वेधले.

40 वर्षे रखडलेल्या या प्रकल्पात पूर्ण क्षमतेने पाणी साठा होऊनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत ते पाणी पोहचू शकलेले नाही ही खेदाची बाब असून केवळ श्रेयासाठी धडपडणाऱ्यांनी याचेही आत्मचिंतन करावे अशी अपेक्षा बोलून दाखविली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोसीखुर्द प्रकल्पाची पाहणी केली, पर्यटनाच्या संधीबाबत माहिती घेत कौतुकही केले ही चांगली बाब असतानाच जलपर्यटनात बोट बंद पडणे, शेतकऱ्यांना पोलिसांनी रोखून धरणे अशा काही अप्रिय घडामोडींनी या दौऱ्याला गालबोट लागले. हे सर्व सुसंवादातून टाळता आले असते यावर महाजन यांनी भर दिला.

एखाद्या सैनिकांचे देशसेवेत ज्याप्रमाणे योगदान असते तेच योगदान कुठल्याही प्रकल्पात शेतकऱ्यांचे असताना अजून प्रकल्पग्रस्ताचे प्रश्न सुटलेले नाहीत, त्यांना मुख्यमंत्र्यांना भेटू दिले गेले नाही हे निश्चितच चांगले लक्षण नाही. अधिकाऱ्यांनी झालेली चूक खुल्या दिलाने दुरुस्त करावी, हे सदोष फलक काढून ज्यांचे योगदान आहे त्या सर्व अभियंत्यांची नावे सन्मानाने लावावी अशी मागणी महाजन यांनी केली. एकंदरीत गोसिखुर्द प्रकल्पावरील हे श्रेयनामावलीचे प्रकरण वाटते तसे आता सोपे राहिलेले नाही हे निश्चित.

चूक झाली : सीई आशीष देवगडे

विदर्भ विकासाच्या दृष्टीने महत्वाकांक्षी अशा गोसिखुर्द राष्ट्रीय प्रकल्पासाठी ( Gosikhurd National Project ) मोलाचे योगदान देणाऱ्या, रक्ताचे पाणी करणाऱ्या अनेक अभियंत्यांची नावे ( Chief Minister Eknath Shinde ) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्याच्या वेळी नामफलकावर बेदखल करण्यात आली. या ( Shanknad News Channel ) शंखनाद न्यूज चॅनेलच्या वृत्ताने सिंचन विभागात खळबळ माजली. अनेकांनी आपल्या संतप्त भावना बोलून दाखविल्या. माजी अधीक्षक अभियंत्यांनी हा अन्याय असल्याचा, सरकारचे याकडे लक्ष वेधण्याचा इशारा देत आपला संताप व्यक्त केला.

नागपुरातील सिंचन सेवा भवनात मुख्य अभियंता ( Ashish Devgade, Superintending Engineer Ankur Desai ) आशिष देवगडे, अधीक्षक अभियंता अंकुर देसाई यांच्याकडून दोष कुणाचा, कुठल्या निकषावर ही निवडक नावेच फलकावर झळकली याविषयीचा मागोवा घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. यावेळी गेले काही दिवस हे प्रकरण चर्चेत आहे. निश्चितच चूक झाली. या प्रकल्पासाठी अनेकांचे मोठे योगदान आहे. मात्र, जाणीवपूर्वक हे घडलेले नाही असा दावा करतानाच सर्वांचीच नावे या प्रकल्पाच्या श्रेय नामावलीत यावीत, शासनाकडून त्यांचा यथोचित सन्मानही व्हावा यासाठी प्रयत्न सुरू असल्याची भावनाही वरिष्ठ पातळीवर कानी पडली. मात्र, इन कॅमेरा ‘शंखनाद’ प्रतिनिधींशी बोलण्यासाठी कुणीही तयार झाले नाही. अर्थातच विभागामार्फत या चुकीचे परिमार्जन कधी होणार ? हा प्रश्नच आहे. आता जलसंपदा विभाग असलेले नागपूरकर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेतल्याची आणि आगामी हिवाळी अधिवेशनात या श्रेयवादाचे पडसाद निश्चितच उमटतील अशी माहिती आहे. बघूया नेमके काय होतंय ते….

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा