सीमावर्ती गावांकडून आक्रमक भूमिका, शेजारच्या राज्यात जाण्याचा इशारा

0

मुंबई: राज्यातील सांगली जिल्ह्यातील काही गावांनी पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेत कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिलेला असताना आता त्यात नांदेड, नाशिक आणि चंद्रपूर गावातील गावांचीही भर पडलेली आहे. (More Maharashtra villages seek merge with neighbouring state) नाशिकमधील नाशिकमधील सुरगाणा तालुक्यातील काही गावांनी गुजरातमध्ये जाऊ देण्याची मागणी केली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली, धर्माबाद, उमरी, देगलूर, किनवट तालुक्यातील काही गावांना तेलंगणात जायचे आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातल्या तेलंगणा राज्याशी सीमावाद असलेल्या 14 गावांचा प्रश्न सोडवा, अशी मागणी सीमा भागातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली आहे. सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील 48 गावातील नागरिकांनी पाण्याच्या प्रश्नावरुन कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला होता.


चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील १४ गावांचा तेलंगणा राज्याशी सीमावाद सातत्याने चर्चेत येत असतो. तो आता या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. . मुकादमगुडा, परमडोली, महाराजगुडा, अंतापूर, येसापूर, पळसगुडा या सारखी 8 महसुली आणि 6 गाव-पाडे यांचा त्यात समावेश आहे. 90 च्या दशकात तत्कालीन आंध्रप्रदेश सरकारने जिवती तालुक्यातील 14 गावांवर आपला हक्क सांगितल्यानंतर प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले होते. मात्र 1997 साली सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निर्वाळा महाराष्ट्राच्या बाजूने दिल्यानंतर देखील आजपर्यंत ही गावे पूर्णतः महाराष्ट्र राज्यात समाविष्ट होऊ शकलेली नाहीत. या गावांमध्ये दोन्ही राज्यांच्या ग्रामपंचायती- अंगणवाडी- शाळा, रुग्णालये व कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा