स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या पुतळ्याचे अनावरण

0

अभिनेते नाना पाटेकर शुक्रवारी काटोलमध्ये

नागपूरः विधायक कार्याचे जनक स्व. अरविंदबाबू देशमुख यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा अनावरण समारंभ शुक्रवार, दि. ०२ डिसेंबर, २०२२ ला दुपारी ४.०० वाजता अरविंद सहकारी बॅंक लि. मुख्यालय, मेन रोड, काटोल येथे संपन्न होणार असून हा समारंभ सुप्रसिध्द अभिनेते व सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर लगेच तालुका क्रीडा संकुल, धंतोली, काटोल येथे एका भव्य सभेचे आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती अरविंद सहकारी बँक लि. चे अध्यक्ष डॉ. आशीष देशमुख यांनी एका प्रसिद्धी पत्रकात दिली आहे. बँकिंग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल बँकेला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. स्व. अरविंदबाबूंच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करून त्याच्या पावन स्मृती दिव्याच्या ज्योतीप्रमाणे आपणांसर्वांना प्रकाशित करत राहतील, असा विश्वास डॉ. आशीष देशमुख यांनी व्यक्त केला आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मंत्री रणजीतबाबू देशमुख उपस्थित राहतील.
पुतळा अनावरण समारंभानंतर नाना पाटेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि माजी मंत्री श्री. रणजीबाबू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली तालुका क्रीडा संकुल, धंतोली, काटोल येथे होणाऱ्या सभेत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ. आशीष देशमुख यांनी केले आहे.