स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेने स्वीकारली ६१ क्षयरुग्णांची जबाबदारी

0
  • पोषण आहार किट वितरित

नागपूर : पंतप्रधान टी.बी. मुक्त भारत अभियानात हातभार लावत क्षयरोग (टी.बी.) बाधितांच्या आहारासाठी सहकार्य करण्याच्या नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. शहरातील स्व. प्रभाकरराव दटके स्मृती सेवा संस्थेद्वारे ६१ क्षयरुग्णांची जबाबदारी स्वीकारण्यात आली असून या रुग्णांना पोषण आहार किट वितरण करण्यात येत आहे. सलग दुस-या महिन्यात संस्थेच्यावतीने माजी महापौर दयाशंकर तिवारी व डॉ. कडू यांच्या हस्ते क्षयरुग्णांना पोषण आहार किट वितरित करण्यात आली.
याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष राऊत, प्रमुख अनिल मानापूरे, कमलेश नायक यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सलग सहा महिने पोषण आहार किट वितरीत करण्याचा संस्थेचा मानस असून दोन महिन्यांच्या किट वितरीत करण्यात आलेल्या आहेत. शिधा, फूड बास्केट, अंडी, मिल्क पावडर व प्रोटीन पावडर आदी पोषक घटकांचा समावेश असलेली ही किट क्षयरुग्णांसाठी मोलाची आहे.
किट वितरणासाठी स्व. प्रभाकरराव दटके स्मृती महाल रोगनिदान केंद्रातील क्षयरोग विभाग प्रमुख नेहा सोनटक्के, मनीषा कांबळे, योगिता सुरखडे आदींनी सहकार्य केले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा