हुडहुडी…! राज्यात थंडीचा जोर वाढला
तापमानात मोठी घट : विदर्भात यवतमाळ सर्वात कूल

0

नागपूर. गेल्या काही दिवसापासून राज्यातील (Maharashtra) विविध जिल्ह्यात तापमानात (Temprature) घट होत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नागरिक थंडीपासून संरक्षणाबरोबरचे थंडीचा आनंद घेताना सुद्धा दिसत आहेत. महाबळेश्वरात (Mahabaleshvar) तापमान 8 अंशांवर पोहोचलेय. तर वेण्णालेक 6 अंशांवर घसरलंय. तिकडे परभणीत यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. परभणीत तापमान 8.3 अंशांवर पोहोचले आहे. विदर्भात सर्वदूर हुडहुडी भरली आहे. रविवारी विदर्भात (Vidharbha) यवतमाळात सर्वाधिक थंडीची नोंद झाली. यवतमाळमध्ये किमान तापमान 10 अंश सेल्सिअस नोंदविले गेले. थंडीचा कडाका वाढल्याने स्वेटर्स, कानटोप्या कपाटातून बाहेर निघाल्या आहेत. रब्बी पिकांना पोषक थंडी पडल्याने शेतकरी आनंदला आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये थंडी अधिकच वाढत जाणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. यामुळे लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक व पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.


परभणीत यंदाच्या मोसमातील सर्वात नीचांकी तापमान


मागच्या तीन दिवसांपासून परभणी जिल्ह्यात थंडीची लाट निर्माण झाली असून सातत्याने तापमान घसरत आहे काल तापमान 10 अंशावर होते तर आज तापमान हे 8.3 अंशापर्यंत घसरले आहे. यामुळे सर्वत्र थंडीचा कडाका मोठ्या प्रमाणावर जाणू लागला आहे. ग्रामीण भागातही शेकोट्या पेटायला सुरुवात झाली आहे. शहरांमध्ये सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागतोय.सर्वत्र नागरिक या गुलाबी थंडीचा आनंद घेताना दिसत आहेत


महाबळेश्वरातील तापमानात आणखी घट


महाबळेश्वरातील तापमानात आणखी घट झाली असून महाबळेश्वरातील तापमान 8 अंशावर तर वेण्णालेक 6 अंशावर गेले आहे. मात्र दवबिंदू गोठले नाहीत. घसरलेल्या तापमानामुळे महाबळेश्वरवासीय आणि पर्यटक चांगलेच गारठले


विदर्भ गारठू लागला


विदर्भात किमान तापमानात दिवसेंदिवस घट होत असल्याचे बघायला मिळत आहे. यवतमाळमध्ये 10.0 अंश सेल्सिअस किमान तापमानाची आज नोंद झाली आहे. नागपूरमध्ये 11.4, गोंदिया 10.4, शनिवारी अमरावतीत सर्वात कमी तापमानाची नोंद झाली होती. रविवारी अमरावतीत 11.7 अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा