२६ नोव्हेंबर संविधान दिन

0

२९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो.

26 नोव्हेंबर हा दिवस भारताच्या लोकशाही (Democracy of India) इतिहासात अतिशय खास मानला जातो. या दिवशी भारतीय लोकशाहीचा पाया रचला गेला. या दिवशी भारताच्या स्वातंत्र्यानंतर स्थापन झालेल्या संविधान सभेने (Constituent Assembly) 1949 मध्ये राज्यघटना स्वीकारली. भारतात दरवर्षी आजचा दिवस संविधान दिवस (Constitution Day of India) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस राष्ट्रीय कायदा दिवस (National Law Day) म्हणूनही साजरा केला जातो. पण हे संविधान 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाले.

संविधान दिन इतिहास अणि महत्व –

घटनेच्या निर्मितीमध्ये सिंहाचा वाटा असणारया भारतीय संविधानाचे जनक तसेच घटनाकार बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानासाठी तसेच त्यांना श्रदधांजली अपर्ण करण्यासाठी घटनेच्या निर्मितीत त्यांनी दिलेल्या योगदानाची आठवण म्हणुन संपुर्ण भारतात हा दिवस दरवर्षी साजरा केला जातो. भारत सरकारकडुन बाबासाहेब आंबेडकर यांना त्यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त श्रदधांजली वाहण्याकरीता 2015 मध्ये 26 नोव्हेंबर रोजी प्रथम अधिकृत संविधान दिन साजरा केला गेला होता.

भारतीय संविधानाचे महत्वाचे दहा मुद्दे

भारताचे संविधान ब्रिटन, आयर्लंड, जपान, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया, कॅनडा यांच्यासह अन्य देशांच्या मसुद्यांनी प्रेरित आहे.

भारताचे संविधान एक हस्तलिखित दस्तावेज आहे. हा जगातील सर्वात मोठ्या हस्तलिखित दस्तावेजांपैकी एक आहे. मूळ इंग्रजी मसुद्यात १ लाख १७ हजार ३६९ शब्द आहेत.

भारताच्या मूळ संविधानात समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा प्रस्तावनेत थेट उल्लेख नव्हता. पण ४२व्या घटनादुरुस्तीद्वारे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सरकारने प्रस्तावनेत समाजवादी आणि धर्मनिरपेक्ष या दोन शब्दांचा थेट समावेश केला. प्रस्तावनेत १९७६ मध्ये ही घटनादुरुस्ती झाली. प्रस्तावनेत आतापर्यंत झालेली ही एकमेव घटनादुरुस्ती आहे.

भारतीय संविधानाची मूळ संरचना भारत सरकार अधिनियम १९३५ वर आधारित आहे.

भारताच्या संविधान सभेची स्थापना १९४६ मध्ये झाली. या सभेचे कामकाज २ वर्ष ११ महिने, १८ दिवस यात सामावलेले १६६ दिवस सुरू होते.

भारतीय संविधानाची मूळ हस्तलिखित प्रत आजही संसदेच्या पुस्तकालयात उपलब्ध आहे.

भारताच्या संविधान सभेने २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधानाच्या मुसद्याला मंजुरी दिली. ही मंजुरी मिळताच जयजयकार, जयघोष, बाक वाजवणे या पद्धतीने संविधान सभेच्या सदस्यांनी आनंद साजरा केला.

संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी संविधानाच्या मसुद्याला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सादर केला. यावेळी केलेल्या भाषणात त्यांनी गांधींना श्रद्धांजली अर्पण केली. गांधीविचारांनी हा एक अनोखा विजय मिळवल्याचे ते म्हणाले.

संविधानाच्या मसुद्याला मंजुरी मिळाल्यानंतर जण-गण-मन झाले आणि संविधान सभेचे त्या दिवशीचे कामकाज संपले. स्वातंत्र्यसैनिक पूर्णिमा बॅनर्जी यांनी जण-गण-मन हे राष्ट्रगीत गायले.

संविधानातील तरतुदीनुसार सभागृहाने २४ जानेवारी १९५० रोजी देशाच्या पहिल्या राष्ट्रपतींची निवड झाली. एका विशेष अधिवेशनात संविधान सभेचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र प्रसाद यांना भारतीय गणराज्याचे पहिले राष्ट्रपती म्हणून निवडण्यात आले.

भारताचे संविधान कधी अणि केव्हा लागु झाले होते?

26 नोव्हेंबर रोजी समितीने सादर केलेला मसुदा संविधान सभेने स्वीकारला होता अणि 26 जानेवारी 1950 रोजी ह्या संविधानाला लागु करण्यात आले होते.

भारताचे संविधान तयार करायला साधारणत किती कालावधी लागला होता?

भारताचे संविधान तयार करायला साधारणत २ वर्ष ११ महीने अणि १८ दिवस इतका लांब तसेच दिर्घ कालावधी लागला होता.

दोन महिन्यांनंतर झाली अंमलबजावणी

26 नोव्हेंबर हा स्वतंत्र भारताच्या दृष्टीने खूप खास दिवस आहे. हा दिवस संविधान दिन (Constitution Day) म्हणून साजरा केला जातो. 26 नोव्हेंबर 1949 रोजी राज्यघटना पूर्णपणे तयार करण्यात आली होती. परंतु दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर 26 जानेवारी 1950 रोजी त्याची अंमलबजावणी करण्यात आली. भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला स्वतंत्र भारतात राहण्याचा समान अधिकार दिला आहे.

संविधान तयार व्हायला किती दिवस लागले?

संविधान तयार व्हायला 2 वर्षे 11 महिने 18 दिवस लागले, ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी पूर्ण झाले. भारतीय प्रजासत्ताकाची ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली. संविधानाची मूळ प्रत प्रेमबिहारी नारायण रायजादा यांनी लिहिली होती. हे कॅलिग्राफीद्वारे इटॅलिक अक्षरात लिहिलेले आहे. राज्यघटनेच्या मूळ प्रती हिंदी आणि इंग्रजी या दोन भाषांमध्ये लिहिण्यात आल्या होत्या. आजही भारताच्या संसदेत ही घटना सुरक्षित ठेवण्यात आली आहे.

. कसं लिहीलं गेलं संविधान?
-आपलं संविधान हिंदी आणि इंग्रजी भाषेत हातानं लिहिलं गेलं. यानंतर बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं ते पुन्हा कॅलिग्राफत लिहिण्याी जबाबदारी त्यांना देण्यात आली. भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे.

.संविधान सभेचे प्रमुख कोण कोण होते?

-२९ऑगस्ट १९४७ पासून मसुदा समितीनं आपल्या कामकाजास सुरुवात केली. जवाहरलाल नेहरू,अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, एन. गोपालस्वामी अय्यंगार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, के. एम. मुन्शी, सय्यद मोहमद सादुल्लाह, बी. एल. मित्तर, डी. पी. खैतान अशा दिग्गज नेत्यांच्या मसुदा समितीने भारतीय संविधानाचा मसुदा तयार केला आहे.

. संविधान सभचे अध्यक्ष कोण होते?
-९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समिती गठीत करण्यात आली. सच्चिदानंद सिन्हा या समितीचे हंगामी अध्यक्ष होते. पुढं ११ डिसेंबर १९४६ रोजी डॉ. राजेंद्रप्रसाद या समितीचे अध्यक्ष झाले.

. संविधानाच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
-फाळणीनंतर संविधान सिमितीच्या संदस्यांची संख्या २९२ झाली. समितीच्या ११ बैठका झाल्या. त्या १६५ दिवस चालल्या. समितीच्या १९ उपसमित्या जलद कामकाजाच्या दृष्टीनं कार्यरत होत्या. त्यात मसुदा समिती होती. या महत्त्वाच्या समितीच्या अध्यक्षपदी डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते. या मसुदा समितीच्या ४४ सभा झाल्या.

b-r-ambedkar

. आपल्या संविधानात किती परिशिष्टे आहेत?
– भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान आहे. समता, बंधुता, स्वातंत्र्य व न्याय तसेच प्रज्ञा, शील, करुणा व मैत्री या मूल्यांची राज्यघटनेत बीजे रोवून भारताच्या संविधानाची निर्मिती करण्यात आली. मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या (जुलै २०१७) मध्ये भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत. आतापर्यंत १०१ घटनादुरुस्त्या झाल्या आहेत.

. भारतीय संविधान कधी लागू करण्यात आलं?
-२६ जानेवारी, १९५० रोजीच भारतीय संविधानाचा स्वीकार करण्यात आला. भारत देश प्रजासत्ताक देश म्हणून अस्तित्वात आला.

. संविधानात कोणाचं हस्तलेखन आहे?
– भारताचे संविधान बनून तयार होत होते. पण संविधान हे हस्तलिखीत असावं अशी नेहरुंची इच्छा होती. बिहारी नारायण रायजादा कॅलिग्राफीची कला अवगत असल्यानं याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. संविधान लिहिण्यासाठी २५४ दौत आणि ३०३ पेन वापरण्यात आले. संविधान लिहिण्यासाठी ६ महिने लागले.

constiution

.संविधानाच्या पानांवर नक्षीकाम कोणी केलं?
-आचार्य नंदलाल बोस यांच्या मार्गदर्शनाखाली शांतिनिकेतनमधील कलाकारांनी भारतीय संविधानातील संपूर्ण हस्तकला पूर्ण केली होती. तसंच प्रास्ताविकाच्या व संविधानाच्या इतर पानांवरील नक्षीकाम व सजावट जबलपूरचे व्यौहार राममनोहर सिन्हा यांनी बनवलेली आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा