९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनात पुस्तक प्रकाशन व्यासपीठ
नागपूर, 21 नोव्हेंबर 2020

0

विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त वर्धा येथे दि . ३,४ आणि ५ फेब्रुवारी २०२३ या दिवसांमध्ये आयोजित होणाऱ्या ९६ व्या अ. भा. मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजित कार्यक्रमात पुस्तक प्रकाशन व्यासपीठ उभारण्यात येणार आहे.
या व्यासपीठाला साहित्य क्षेत्रातील मान्यवर दिवंगत साहित्यिकाचे नाव देण्यात येणार असून या ठिकाणी सुमारे पाचशे श्रोते बसू शकतील अशी व्यवस्था करण्यात येणार आहे. या व्यासपीठावर मान्यवर साहित्यिकांच्या शुभहस्ते पुस्तक प्रकाशनांचा कार्यक्रम आयोजित करण्यात येईल. या व्यासपीठावरून ज्या लेखक, कवींना आपली पुस्तके प्रकाशित करावयाची असतील त्यांना आयोजक संस्थेने निर्धारित केलेले शुल्क भरून आपल्या पुस्तकांचे प्रकाशन करता येईल. आपल्या पुस्तकाचे प्रकाशन या व्यासपीठावरून व्हावे असे ज्या लेखक, कवींना वाटत असेल त्यांनी आधी आयोजकांकडे तशी नोंदणी करणे आवश्यक आहे. नोंदणीच्या आणि प्रकाशन शुल्काच्या संदर्भात इच्छुक लेखक, कवींनी विदर्भ साहित्य संघाचे कार्याध्यक्ष डॉ . रवींद्र शोभणे (९८२२२३०७४३ ) आणि सरचिटणीस श्री . विलास मानेकर ( ९४२२१०४२५२ ) यांच्याशी संपर्क साधावा , असे विदर्भ साहित्य संघातर्फे कळविण्यात आले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा