
नागपूर(Nagpur): दि. १२ एप्रिल २०२६:
महावितरणच्या महाल विभागांतर्गत येणाऱ्या जुना बगडगंज आणि तुळशीबाग येथील वीज वाहिन्यांवर तांत्रिक देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. या कामामुळे सोमवार, दिनांक १३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ०८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत या वाहिन्यांवरील विविध परिसरातील वीज पुरवठा तात्पुरता बंद राहणार असल्याची माहिती आहे.
११ केव्ही बेसा उपकेंद्र येथून निघणाऱ्या ‘ताजबाग वाहिनी’वर एबी स्विच मेंटेनन्स आणि वीज वाहिन्यांना अडथळा ठरणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्याचे काम करण्यात येणार आहे. यामुळे ठाकूर प्लॉट, आझाद कॉलनी, तोहीद नगर, ताजबाग, अवलिया नगर आणि ताजबाग उरस ग्राउंड या परिसरातील वीज पुरवठा सकाळी ४ तास बंद राहील.
त्याचप्रमाणे, सूतगिरणी उपकेंद्र येथून निघणाऱ्या ११ केव्ही ‘सुभेदार वाहिनी’वरही देखभाल दुरुस्तीचे काम केले जाणार आहे. परिणामी गवंडिपूरा, भांडे प्लॉट, सोळंकीवाडी, सिंधीबन आणि स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या भागांतील वीज ग्राहकांना सकाळी ०८.०० ते दुपारी १२.०० या वेळेत वीज कपातीचा सामना करावा लागेल.
पावसाळ्यापूर्वीची पूर्वतयारी आणि अखंडित वीज पुरवठ्यासाठी ही दुरुस्ती अत्यंत आवश्यक असून, वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे. कामाची व्याप्ती लक्षात घेता ग्राहकांना होणाऱ्या त्रासाबद्दल महावितरणने दिलगिरी व्यक्त केली आहे.
—



















