

नागपूर (Nagpur), दि. 28 मे, 2026: – स्वातंत्र्यलढ्यातील अग्रगण्य क्रांतिकारक, द्रष्टे समाजसुधारक, प्रखर राष्ट्रभक्त आणि अंदमानच्या काळ्या पाण्याची कठोर शिक्षा भोगणारे एकमेवाद्वितीय स्वातंत्र्यसैनिक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज महावितरणतर्फे त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
काटोल मार्गावरील महावितरणच्या ‘विद्युत भवन’ येथे जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांच्या अजोड देशसेवेला व क्रांतीकार्याला अभिवादन केले.
या प्रसंगी उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, प्रणाली विश्लेषक प्रवीण काटोले आणि उपमुख्य जनसंपर्क अधिकारी योगेश विटनकर प्रामुख्याने उपस्थित होते. स्वातंत्र्यवीरांच्या महान त्यागाचे स्मरण करत महावितरणच्या अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी, अभियंत्यांनी व कर्मचाऱ्यांनीही त्यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
– उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
















