

सिंदेवाही – राजोली रेल्वेमार्गावरील घटना वनविभाग व रेल्वे प्रशासन घटनास्थळी दाखल
सिंदेवाही : गोंदिया–नागभीड–बल्लारशाह रेल्वेमार्गावर एका पट्टेदार वाघाचा मालगाडीच्या धडकेत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. सिंदेवाही आणि राजोली रेल्वे स्थानकादरम्यान किलोमीटर क्रमांक ११८१/८ येथे ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, वाघ रेल्वे ट्रॅक ओलांडत असताना भरधाव मालगाडीची जोरदार धडक बसल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभाग तसेच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत वाघाचा पंचनामा करण्यात येत असून शवविच्छेदनानंतर पुढील तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे वन्यजीवांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, संबंधित रेल्वेमार्गावर वन्यप्राण्यांच्या हालचाली लक्षात घेऊन आवश्यक सुरक्षा उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















