बुलडाणाः बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजा येथे बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याची चर्चा सुरु आहे. सिंदखेडराजामध्ये सकाळी 10:30 वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल झाल्याचे दावे होत असून परीक्षा केंद्रावर मोबाईलला बंदी असतानाही पेपर सोशल मीडियावर कसा काय व्हायरल झाला, याबद्दल प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही पेपरफुटीचा प्रश्न उपस्थित केला आहे. राज्य सरकार किंवा शिक्षण मंडळाकडून अद्याप त्यावर कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. बुलडाणा जिल्ह्यात सिंदखेडराजामध्ये सकाळी साडेदहा वाजल्यापासून गणिताचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परीक्षेपूर्वीच पेपरचे फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी विधान सभेत हा मुद्दा उपस्थित केला. सरकार काय करतेय मला काही कळत नाही. सरकार झोपले की काय? यामुळे बारावीच्या मुलांचे किती नुकसान होणार, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. 12वी च्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात कॉपीमुक्त अभियान राबवले जात आहे.
बारावीचा गणिताचा पेपर फुटला?
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा