अमरावती (Amravti)8 ऑगस्ट
शेदूरजनाघाट पोलिसांची कारवार्ड कत्तलीसाठी गोवंशांना घेऊन जात असलेले वाहन शेंदूरजनाघाट पोलिसांनी पकडले. या कारवाईत १३ गोवंशांची सुटका करून त्यांना जीवनदान देण्यात आले. तर एका गोवंशाचा मृत्यू झाला.
गोवंशाची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती शेंदूरजनघाट पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारावर पोलिसांनी पुसलाबसस्टॅण्ड परिसरात नाकाबंदी करून पांढुर्णा येथून वरूडकडे येत असलेल्या संशयास्पद वाहन क्रमांक एमएच २७ व्हीएक्स ०९९४ ला थांबण्याचा इशारा
केला. मात्र, चालकाने न थांबता वाहन माघारी फिरविले. पोलिसांनी वाहनाचा पाठलाग केला. त्यावर चालकाने वाहनसोडून पळ काढला. पोलिसांनी वाहनाची पाहणी केल्यावर त्यात १४ गोवंश दिसून आले. त्यातील एका गोवंशाचा मृत्यू झाला होता.
पोलिसांनी वाहन जप्त करून गोवंशांना येरला येथील गोरक्षणमध्ये दाखल केले. या प्रकरणी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई ठाणेदार महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शेगोकार, कुंदन मुधोरकर, वीरेंद्र अमृतकर, संदीप वानखडे, वसीम शेख यांनी केली.