(19 gamblers were detained)अमरावतीत जुगारावर धाड, १९ जुगारी अटकेत

0

गुन्हे शाखेची कारवाई ; ३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त
अमरावती. नागपुरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ॲकेडमिक हायस्कूलच्या मागे गवळीपुरा (Gawlipura Behind Academic High School in Nagpuri Gate Police Station Precinct) येथे सुरू असलेल्या जुगारावर गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकली (crime branch team took action on gambling). या कारवाईत १९ जुगाऱ्यांना ताब्यात घेण्यात (19 gamblers were detained) आले. त्यांच्याकडून ३ लाख ४४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संबंधित शाळेमागे मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जात अल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे ही कारवाई करण्यात आली. शहराच्या अनेक भागात अशा प्रकारचे जुगार अड्डे सुरू आहेत. गुन्हेगारी व्यक्तीकडून बिनधास्तपणे जुगार अड्डे चालविले जात असून त्यातून मोठ्या प्रमाणवर पैसाही गोळा केला जात असल्याची माहिती आहे. गवळीपुरातील अड्ड्याप्रमाणेच अन्य ठिकाणीही अशाप्रकारची कारवाई होणार काय?, असा प्रश्न अमरावतीकरांकडून विचारला जात आहे.
अटक आरोपींमध्ये शेख अन्सार शेख सुलतान (४०, रा. तारखेडा), गुलाम अहमद निसार अहमद, संजय प्रताप सारसर, अंकुश रावसाहेब गंधे, विनेश बापुराव पंढसे, शैलेश सुरेशराव घोंगडे, सुनीलसिंग शेरासिंग बावडी, मनीष वसंतराव ढवळे, संजय किसनराव डोळस, अनुप गजानन बिजवे, विलास संतोष वाहाणे, शेख वसीम शेख करिम, कादर खान शाहीद खान, मुजफ्फर खान जफर खान, अफरोज खान मजीद खान, अक्षय मनोज डिक्याव, गजानन आबाराव इंगोले, राहिल व ईलयास अली महेबूब अली या जुगाऱ्यांचा समावेश आहे.
जुगाऱ्यांकडून रोख ३ लाख ४४ हजार ८२० रुपये व अन्य साहित्य असा एकूण ३ लाख ४४ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जुन ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे व राजकिरण येवले, राजूआप्पा बाहेनकर, फिरोज खान, सतीश देशमुख, अजय मिश्रा, प्रशांत वडनेरकर, सय्यद इम्रान, निवृत्ती काकड आदींनी ही कारवाई केली.आरोपीविरुद्ध नागपुरी गेट ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.