१८९७ मध्ये प्लेगची साथ आल्यावर त्यांनी लागण झालेल्या लोकांसाठी काम केले. या प्रक्रियेत सावित्रीबाई फुले यांना देखील प्लेगची लागण झाली. १० मार्च १८९७ रोजी त्यांचा मृत्यू झाला. ३ जानेवारी हा सावित्रीबाईंचा जन्मदिवस संपूर्ण महाराष्ट्रात बालिका दिन व महिला मुक्तीदिन म्हणून साजरा केला जातो.३ जानेवारी म्हणजे देशाची पहिली महिला शिक्षक, महिला विद्यार्थीनी, महिला समाजसेविका असे विविध पातळीवर योगदान दिलेल्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती. सावित्रीबाई केवळ पहिल्या महिला शिक्षका किंवा पहिल्या पहिल्या महिला शाळेच्या पहिल्या मुख्यध्यापिका आणि संस्थापिका देखील होत्या. विद्यार्थीनी नसुन त्या देशातील म सावित्रींचा जन्म सातारा जिल्ह्यातील नायगाव नामक छोट्या गावी झाला होता. अवघ्या ९ वर्षांच्या सावित्रीचा विवाह तेरा वर्षांच्या ज्योतीराव फुलेंशी लावून देण्यात आला. वयाच्या ९व्या वर्षा पर्यत सावित्रईंनी एकही वर्ग शिक्षण घेतलं नव्हतं. पण त्यांचे तेरा वर्षांचे पती मात्र ३ वर्गात शिकत होते आणि आपल्या नवऱ्याला शिकताना बघूनचं सावित्रींच्या मनात शिक्षणाविषयी गोडी निर्माण झाली. अखेर शिक्षण घेण्याचा संकल्प करत सावित्रींनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली.
लोकांची टिका टिपण्णी ऐकत सावित्रींनी स्वत शिक्षण घेतल. एवढचं नाही तर अवघ्या वयाच्या सतराव्या वर्षी देशातील पहिली महिला शाळा उघडून मुलींना शिक्षण देण्यास सुरवात केली. आज याचं क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती.
दरम्यान सावित्रीबाई फुले यांनी समाजसुधारक ज्योतिराव फुले (Jyotirao Phule) यांच्यासोबत महिलांच्या शिक्षणासाठी लढा दिला. फुले दाम्पत्याने 1848 मध्ये महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील भिडे वाडा (Bhide Wada) येथे महिलांसाठी देशातील पहिली शाळा उघडली. याशिवाय सावित्रीबाई फुले (Savitribai Phule in marathi) यांनीही जात आणि लिंगाच्या आधारावर होणाऱ्या भेदभावाविरुद्ध प्रदीर्घ लढा दिला. यानंतर त्यांनी 1864 मध्ये निराधार महिलांसाठी निवाराही स्थापन केला. सर्व वर्गांच्या समानतेसाठी संघर्ष करणाऱ्या ज्योतिराव फुले यांची धर्मसुधारक संघटना सत्यशोधक समाजाच्या विकासातही सावित्रीबाई फुले यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सावित्रीबाई फुले यांना भारतातील स्त्री चळवळीची जननी देखील मानले जाते.
देशातील पहिली मुलींची शाळा उघडल्यानंतर सुमारे 4 वर्षांनी सावित्रीबाई फुले यांनी 1852 मध्ये दलित मुलींसाठी स्वतंत्र शाळा उघडली. याशिवाय त्यांनी देशातील किसान स्कूलचीही स्थापना केली होती.
लहान वयात लग्न झाले
सावित्रीबाई फुले यांचा विवाह ज्योतिराव फुले (Savitribai Phule married Jyotirao Phule) यांच्याशी 1940 मध्ये वयाच्या नऊव्या वर्षी झाला. लग्नानंतर ती ज्योतिरावांसोबत नायगावहून पुण्याला राहायला गेली. सावित्रीबाई फुले यांना वाचनाची खूप आवड होती. हे पाहून तिच्या पतीने तिला लिहायला आणि वाचायला शिकवले. त्यानंतर त्यांनी अहमदनगर आणि पुणे येथे शिक्षक होण्याचे प्रशिक्षणही घेतले. 1847 मध्ये चौथी परीक्षा उत्तीर्ण होऊन ती पात्र शिक्षिका बनली.
सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक कार्य
या देशात दोन हजार वर्षांपासून ९७ टक्के लोकांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. शिक्षण घेण्याचा अधिकार फक्त ब्राह्मणांनाच होता. त्यांच्या स्त्रियांनाही शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता.त्यांच्या कर्मठ धर्माच्या दृष्टीकोनातून त्यांचीही स्त्री चुल आणि मूल यासाठी वापरण्याची वस्तू होती. तिला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार नव्हता. अशा काळात आणि पेशवाईच्या पुण्यात फुले दांपत्यांनी शिक्षणाचे कार्य सुरू केले. परंतु इतिहासकारांनी सावित्रीबाईची ओळख अशी करून दिली की, ती महात्मा फुले यांच्या पत्नी आणि मुलीच्या शाळेची शिक्षिका म्हणूनच. परंतु सावित्रीबाईची योग्यता ही त्याहीपेक्षा खूप मोठी होती.
सावित्रीबाई शाळेत शिक्षिका म्हणूनच काम केले नाहीत, तर त्या आपल्या शैक्षणिक अनुभवावरून आणि निरीक्षणावरून अनेक शिक्षण शास्त्रविषयक निष्कर्ष काढून त्या अंमलात आणणाऱ्या शास्त्रज्ञ होत्या. मागासवर्गीय मुलांचा शैक्षणिक विकास करायचा असेल तर त्याच समाजातील शिक्षक पाहिजेत. म्हणून पुढे त्या पद्धतीने मागासवर्गातील शिक्षकास प्राधान्य दिले. कारण सावित्रीबाई आणि सहकारी फातिमा शेख यांचे शिकविणे उत्कृष्ट असूनही श्रीमंत व ब्राह्मण मुलीच्या शाळेची प्रगती अधिक आहे असे दिसून आले.
तेव्हा सावित्रीबाईंनी असा सिद्धांत मांडला की, ज्या समाजातून व ज्या परिस्थितीतून मुली, मुले येतात, त्याचा बरा वाईट परिणाम संबंधित मुला-मुलीच्या शिक्षणावर होत असतो. कारण उच्च वर्णातील शिक्षक हे शूद्र जातीतील मुलांना जवळ करणार नाहीत. आणि उच्च जातीतील मुलानाच जवळ करीत असतील तर त्यांचा परिणाम समाजातील मुलाच्या मनाचे खच्चीकरण करणारे ठरेल. म्हणून ज्या समाजाची मुलं त्याच समाजाचा शिक्षक असणे गरजेचे असते, हा मानवशास्त्रीय सिद्धांत सावित्रीनी मांडला. इ. स. १८५३ मध्य सावित्रीबाईंनी मांडलेला सिद्धांत आता सर्वमान्य झाला आहे.
आपल्या शाळेत शिक्षिका प्रशिक्षितच असले पाहिजे म्हणून फुले दांपत्यांनी एक नॉर्मल स्कूल काढले. माणसाला नुसते शिक्षण देऊन चालणार नाही तर त्यासाठी शिक्षणाबरोबर संस्कार आणि संगत यांची जोड पाहिजे. तरच माणसाला माणूसपण येऊ शकते, असा शिक्षण सिद्धांत फुले दांपत्यांनी मांडला आणि अंमलात आणला. म्हणून त्यांना शिक्षणतज्ज्ञही म्हणतात.
जोती-सावित्रीनी स्त्री व शूद्रांसाठी चालविलेल्या शाळेची संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ होऊ लागली. १२ फेब्रुवारी १८५३ रोजी मुलांच्या शाळेची तपासणी झाली. पुणे महाविद्यालयातील सभामंडपात तीन हजार शिक्षणप्रेमी लोकांनी गर्दी केली होती. या कार्यक्रमाला ब्रिगेडियर ट्रायडेल व त्यांची पत्नी इ.सी. जोन्स, प्रोफेसर फ्रेजर, सरदार अण्णा साहेब ढमढेरे, प्रोफेसर छत्रे, प्रो. कृष्णशास्त्री चिपळूणकर, श्री. बापुराव भांडे आणि पुणे महाविद्यालयाचे प्रा. मेजर कँडी इत्यादी प्रतिष्ठित व विद्वान मंडळी या समारंभास हजर होती.
२१ मार्च १८५३ रोजी जोतिरावांनी स्थापन केलेल्या अतिशूद्राच्या शाळेची वार्षीक परीक्षा शुक्रवार पेठेतील पेशव्यांच्या तालीमखान्यात झाली. या समारंभास न्यायमूर्ती कीझ हजर होते.
जोतिरावांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेत तीन मुलींच्या शाळा होत्या.या शाळेतील मुलींची पटसंख्या २३७ होती. या मुलीच्या शाळेसाठी १६ डिसेंबर १८५३ ला राज्यपाल ना. व्हायकाऊंट फॉकलंड यांच्याकडे जमीन मिळावी म्हणून अर्ज केला होता. त्यानुसार शाळेच्या संस्थेस भोकरवाडी येथील सहा एकर तेहतीस गुंठे जमीन सन १८५७ मध्ये देण्यात आली.
जोती-सावित्रीचे शैक्षणिक कार्य पाहून इंग्रजांना जाग आली आणि अस्पृश्यांच्या शिक्षणविषयक धोरणात बदल केला. सन १८५४ साली ईस्ट इंडिया कंपनीने वूड नामक खलिता प्रस्तुत केला. या खलित्यानुसार येथून पुढे जातीच्या कारणास्तव कोणत्याही मुलीला सरकारी शाळेत अथवा महाविद्यालयात प्रवेश नाकारता येणार नाही, असे जाहीर करण्यात आले. त्यामुळे जोती-सावित्रीनी चालविलेल्या महार-मांगाच्या शैक्षणिक कार्यास कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले.
यावरच न थांबता जोती-सावित्रीनी शेतकरी आणि त्यांच्या बायकांसाठी प्रौढांची रात्रीची शाळा सुरू केली. या शाळेत जोतीराव व सावित्रीबाई . रोज रात्री दोन तास मोफत शिकवित असत. या जोडप्यांनी अंधश्रद्धेचा अज्ञान, अंधकार हा ज्ञानाचा दिवा लावूनच नष्ट केला. त्यामुळे त्या संपूर्ण भारतीय समाजाच्या राष्ट्रपिता व आणि राष्ट्रमाता ठरल्या.
सावित्रीबाई फुले यांचे शेवटचे दिवस
सावित्रीमातेचं वय झालेलं तरी पण त्यांचं सत्यशोधक चळवळीचं कार्य चालू होतं. त्या शरीराने थकलेल्या असल्या तरी मनाने थकलेल्या नव्हत्या. लोककल्याणासाठी, लोकांना जागृत करून त्यांच्यातील अज्ञान, अंधश्रद्धा दूर करणार नाही तोपर्यंत समाजात परिवर्तन घडवून येणार नाही, हे सावित्रीमाता जाणत होती. म्हणून त्या कोणतेही संकट आले तरी त्या न डगमगता त्या संकटाला तोंड देत असत. हा क्रम त्याचा चालू असताना, निसर्गाचा कोप झाला.
निसर्गाचा कोप म्हणजे मग तो भूकंप, चक्रीवादळ, अतिवृष्टी किंवा भयंकर रोगाची साथ असो या शक्तीपुढे माणूस हतबल होतात. आणि निसर्ग कोपाचे बळी पडत असतात.
त्याकाळी विज्ञानाची प्रगती झालेली नव्हती. भारतात तर शिक्षणाच्या अभावापायी दवाखानेही नव्हती. माणूस अज्ञान, अंधश्रद्धा, वाईट रूढी परंपरेत जगत होता आणि मरतही होता. याचाच परिणाम म्हणून नारू, देवी, कॉलरा, विषमज्वर, कावीळ, प्लेग यासारखे साथीचे रोग व्हायचे आणि अनेक लोक एका पाठोपाठ एक असे प्रत्येक घरातील चार पाच लोक मरायचे. हे रोग संसर्गजन्य असल्यामुळे रोगी माणसांची सेवा करण्यास निष्काळजीपणा झाला की तोही दगावयाचा. म्हणून त्या काळात जन्म मृत्युचे प्रमाण जवळ जवळ सारखेच असायचे.
सावित्रीमाता दुष्काळाचा सामना करून बाहेर पडतात न पडतात तोच दुसरा निसर्ग कोप सुरू झाला. सन १८९७ साली उंदरं पटापट मरू लागली आणि प्लेग नावाच्या साथीचा रोग सुरू झाला. पुण्यामध्ये प्लेगने थैमान घातले. पुणे परिसरात शेकडो माणसं मृत्युमुखी पडू लागली. या आकस्मिक प्रकारामुळे इंग्रज सरकारही गोंधळून गेले. हा रोग एकापासून दुसऱ्याकडे जातो. सुरुवातीला हा रोग हाँगकाँग बंदरापासून सुरू झाला.
दळणवळणाच्या माध्यमातून हा रोग मुंबईला आला. तेथून हा प्लेगचा रोग पुण्यात आला होता.त्यामुळे इंग्रज सरकारने दळणवळणावर प्रथम बंदी घातली. रोग्याचा शोध घेण्यासाठी सैनिकांना पाचारण केले. इंग्रज सैनिक रोग्यांचा शोध घेत गावोगावी हिंडू लागले. ते सैनिक घर स्वच्छतेच्या नावाखाली लोकांना मानसिक त्रास देऊ लागले. शारीरिक छळ करू लागले. घरात रोगी दिसला की त्याला ओढतच घराबाहेर आणून रुग्णवाहिकेत टाकू लागले आणि जनावराप्रमाणे जंगलात, शिवारात फेकून देऊ लागले. त्यामुळे लोकांनी इंग्रज सैनिकांची धास्तीच घेतली होती.
सावित्रीमातेला हे दृश्य पाहवले नाही. त्यांनी सत्यशोधक समाजाची बैठक घेऊन या रोगाला तोंड देण्यासाठी “प्लेग निवारण महिला कमिटी” नेमली आणि या सैनिकाची अरेरावी थांबविण्यासाठी सावित्रीमाता तडक जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. मातेने जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन सैनिकांनी लोकांचा छळ केल्याची तक्रार नोंदवून हा प्रकार थांबविण्या सांगितले.
सावित्रीमातेने “प्लेग निवारण महिला कमिटी”च्या मार्फत आपल्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन लोकांना मदत करण्यास सुरू केले. त्यावेळी सावित्रीमातेचा मुलगा यशवंत हा डॉक्टरची पदवी घेऊन अहमदनगर येथे नोकरी करत होता. त्याला पुणे येथे बोलावून घेतले आणि वानवडी येथे ससाण्याच्या माळावर आपला खाजगी दवाखाना उघडला. डॉ. यशवंतरावांनी आईने हाती घेतलेल्या मानवसेवेच्या कार्यास हातभार लावण्याचे कार्य सुरू केले. सत्यशोधक समाज संघटनेचे कार्यकर्ते आजारी माणसाला उचलून दवाखान्यात नेत होते. त्यावर डॉ. यशवंत उपचार करीत होते. या काळात सावित्रीमाता पायात भिंगरी बांधल्यासारख्या फिरत असत. या वयातही प्रचंड धावपळ करून लोकसेवा करीत होते.त्या मानव सेवा हिच ईश्वर सेवा म्हणून मानव सेवेला वाहून घेतल्या होत्या.
सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू
पुण्याजवळ मुंढवे नावाचं खेडं होतं. तेथे मागासवर्गीयांची वस्ती होती. तेथे प्लेग रोगाने थैमान घातलेला होता.सावित्रीमातेला ही गोष्ट समजली. ताबडतोब त्या वस्तीत गेल्या. पांडुरंग बाबाजी गायकवाड नावाचा मुलगा तापानं फणफणत होता. त्याला चालणंही शक्य नव्हत आणि वाहनही नव्हती. त्याच्यावर ताबडतोब इलाज करणे गरजेचे होते. त्योवळी सावित्रीमातेनं क्षणाचाही विलंब न करता वयाच्या सहासष्टाव्या वर्षी त्या मुलाला स्वतःच्या पाठीवर टाकून डॉ. यशवंतरावांच्या दवाखान्यात आणले. त्या मुलाची प्लेगची लागण सावित्रीमातेला झाली होती. त्याच्या काखेत भली मोठी गाठ आली. अंगात ताप वाढला. डॉक्टर मुलानी खूप प्रयत्न केले; परंतु ते प्रयत्न व्यर्थ गेले. सावित्रीबाई फुले यांचा मृत्यू १० मार्च १८९७ रोजी प्लेगच्या साथीने झाला आणि एकच अक्रोश झाला. सामान्य माणसांसाठी, राष्ट्रासाठी काम करणारी राष्ट्रमाता सर्वांना सोडून गेली.