भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप याचं निधन, कर्करोगाशी झुंज अखेर संपली

0

विधान परिषद निवडणुकीच्या वेळी पीपीई कीट घालून मतदानाला हजर राहणारे भाजपचे पक्षनिष्ठ आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं आहे. लक्ष्मण जगताप दुर्धर आजाराने त्रस्त होते.  गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची आज प्राणज्योत मालवली. मागील आठवड्यातच भाजपच्या आमदार मुक्ता टिळक यांचं निधन झालं होतं. त्यानंतर आज लक्ष्मण जगताप यांनीही जगाचा अखेरचा निरोप घेतला.

पिंपरी चिंचवड विधानसभा क्षेत्राचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक होती. त्यामुळे त्यांच्यावर घरीच उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्यामुळे त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल केलं होतं. पण उपचारादरम्यान आज त्यांचं निधन झालं.  आज दुपारी 2 ते 6 या दरम्यन त्यांचं पार्थिव अंत्य दर्शनासाठी त्यांच्या घरी ठेवण्यात येणार आहे. संध्याकाळी 7 वाजता पिंपरी गुरव इथं अंत्यविधी होईल.

विशेष म्हणजे,  मे महिन्यात विधान परिषद निवडणुकीसाठी (MLC Election) मतदान पार पडलं.यावेळी पिंपरी चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप आजारी असल्याने रुग्णवाहिकेतून विधान भवनात आले होते. त्यानंतर पीपीई कीट घालून ते मतदानाला गेले होते.

लक्ष्मण जगताप हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहे.

त्यांची प्रकृती ही अत्यंत नाजूक होती. पण, अशा परिस्थितीतही त्यांनी राज्यसभेला मतदानाचा हक्क बजावला होता. त्यानंतर विधान परिषद निवडणुकांच्या मतदानासाठी एका खासगी कार्डियाक रुग्णवाहिकेनं मुंबईत आले. यावेळी त्यांच्या सोबत त्यांचे निकटवर्तीय आणि एक डॉक्टरांचा पथक हे लक्ष्मण जगताप यांच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून होते.

आमदार जगताप हे गेली दोन वर्षांपासून आजारी होते. एप्रिल २०२२ पासून त्यांची तब्बेत खालावत गेली. मार्च च्या शेवटच्या आठवड्यात कुटुंबियांनी उपचारासाठी त्यांना अमेरिकेत नेले होते. ३ एप्रिल रोजी पुन्हा ते मायदेशी परतले. दिवाळीच्या दरम्यान त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना बाणेर येथील ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल कऱण्यात आले. नंतरच्या काळात त्यांची तब्बेत अधिक चिंताजनक होत झाली. प्रबळ इच्छाशक्ती मुळे अखेरपर्यंत त्यांनी मृत्युशी दोन हात केले. डॉक्टरांनी अगदी शर्थीचे प्रयत्न केले, पण अखेर सर्व उपाय संपले आणि त्यांची प्राणज्योत मालवली. राजकीय वाटचाल… पिंपरी चिंचवडच्या राजकारणातील स्थानिक दमदार आमदार म्हणून लक्ष्मण जगताप यांच्याकडे पाहिले जायचे. १९८६ मध्ये ते प्रथम नगरसेवक झाले. नंतर स्थायी समिती अध्यक्ष होण्याची संधी त्यांना मिळाली. सन २००० मध्ये ते शहराचे महापौर होते. पुढे हवेली विधानसभेसाठी प्रबेळ दावेदार म्हणून त्यांचे नाव घेतले जात होते, पण विलास लांडे यांना संधी मिळाली होती. नंतर विधान परिषदेसाठी पुणे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी करून त्यांनी काँग्रेसचे चंदूकाका जगताप यांचा पराभव केला होता. राज्यात ती निवडणूक खूपच गाजली होती.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा