
चंद्रपूर, दि. 3 जानेवारी 2022 :
चिंचवड विधानसभेतील भारतीय जनता पक्षाचे आमदार श्री. लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक निष्ठावान लढवय्या सहकारी आणि लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे, अशा शब्दात वने, सांस्कृतिक कार्य आणि मत्स्यव्यवसाय मंत्री श्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपला शोक व्यक्त केला आहे.
ते पुढे म्हणाले की, मितभाषी पण जनतेच्या प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका घेणारे लोकप्रतिनिधी अशी त्यांची ओळख होती. चिंचवडचा ढाण्या वाघ असे त्यांचे वर्णन केले जायचे. गंभीर आजारातही विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकात मतदानाचे आपले लोकशाहीतले कर्तव्य पार पाडून त्यांनी एक उदाहरण घालून दिले. ईश्वर त्यांना सद्गती देवो. जगताप कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सर्वजण सहभागी आहोत, त्यांना या दुःखातून लवकर सावरण्याचे बळ मिळो, असे ना.श्री मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
Related posts:
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ चा भव्य शुभारंभ
June 6, 2026Artical Blog
महावितरणचा 21 वा वर्धापन दिन: ‘ग्राहक देवो भव’चा संकल्प करत साधेपणाने साजरा
June 6, 2026Artical Blog

















