2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री, खासदार संजय राऊत यांचा दावा

0

मुंबई: शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. आपण बाहेर असू वा नसू पण 2024 पर्यंत महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होईल, असा दावा त्यांनी केला आहे (Mp Sanjay Raut). शिवसेनेचे रक्त स्वस्त नाही. सध्याचे राजकीय वातावरण अस्थिर आहे, असेही राऊत यांनी म्हटले आहे. आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने बोलताना खासदार राऊत यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना हा दावा केला आहे. उद्धव ठाकरे, अजित पवार आणि अनेक नेत्यांनी आपल्याला शुभेच्छा दिल्याचे त्यांनी सांगितले. हे लोक पुन्हा मला तुरुंगात टाकू दे, मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे. माझ्यावर असे खोटे आरोप आणि खोट्या कायदेशीर कारवाया होत राहतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे.


पुढे बोलताना राऊत म्हणाले की, ज्यांनी शिवसैनिकांचं रक्त सांडण्याचा प्रयत्न केला आहे. ते राजकारणातून समाजकरणातून, जनजीवनातून पूर्णपणे नष्ट झाले आहेत. त्यांचे भविष्यात फार काही चांगले राहिलेले नाही. शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल, शिवसैनिकाचे रक्त सांडवणार असाल तर, शिवसेनेचे रक्त स्वस्त नाही हे, विरोधकांनी लक्षात घ्यायला हवे, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. काल शिंदे गटाच्या आणि ठाकरे गटात झालेल्या संघर्षाबद्धल राऊत बोलत होते. आपली सत्ता आहे, पोलिस यंत्रणा आपल्याकडे आहे, पैशांची ताकद आहे म्हणून आपण शिवसैनिकांवर हल्ले करणार असाल, शिवसैनिकांचे रक्त सांडणार असाल तर हे चालणार नाही. शिवसैनिकांचे रक्त इतके स्वस्त नाही, हे लक्षात घ्या. गेल्या 50 वर्षात शिवसैनिकांच्या रक्ताच्या थेंबाचा हिशोब द्यावा लागणार आहे, असा इशाराही राऊत यांनी दिला.

*नागपुरी गोळाभात रेसिपी | Nagpur Special Gola Bhat Recipe | Episode 33 | Shankhnaad News*