गाझीयाबादमध्ये 30 गाड्या एकमेकांवर आदळल्या दाट धुक्यामुळे भीषण अपघात

0

गाझीयाबाद. पश्चिम व मध्य भारातात उन्हाची दाहकता (Heatstroke in West and Central India ) जाणवू लागली आहे. होळीपूर्वीच उन्हाळ्याप्रमाणे उन्ह तापू लागल्याने नगारिकांची चिंता वाढली आहे. त्याचवेळी देशाच्या उत्तरेकडील भागात थंडीचा कहर (Cold ravages the northern part of the country) सुरूच आहे. रविवारी उत्तर प्रदेशातल्या गाझियाबादमध्ये (Ghaziabad, Uttar Pradesh ) सकाळी दाट धुक्यामुळे विचित्र पण तेवढाच गंभीर स्वरूपाची घटना घडली. जवळपास तीस गाड्या एकमेकांवर आदळल्या. सकाळी आठ-साडेआठच्या सुमारास दिल्ली-मेरठ एक्सप्रेसवेवर हा अपघात झाल्याचे सांगितले जात आहे. सुदैवाने या दुर्घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या एक्सप्रेस वेवरुन गाड्या वेगाने जात होत्या. मात्र त्यातच एका गाडीने ब्रेक लावल्याने मागून येणाऱ्या गाड्या एकमेकांना धडकत गेल्या आणि हा अपघात झाला. या एक्सप्रेसवेच्या आजूबाजूच्या गावात ही माहिती मिळताच तिथले गावकरी मदतीसाठी आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळी एका कारने ब्रेक मारल्याने त्याच्या मागून येणाऱ्या एका छोट्या कंटेनरच्या ड्रायव्हरनेही ब्रेक मारला आणि त्यामुळे त्याच्या मागून येणाऱ्या मोठ्या आकाराच्या कंटनेरने धडक दिली आणि बाजूने पुढे निघून गेला. यानंतर मात्र मागून येणाऱ्या इतर गाड्याही एकमेकांना धडकल्या.
हा अपघात दाट धुक्यामुळे झाला आहे. यामध्ये एक व्यक्ती गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामध्ये एक स्कूलबसही होती. यामधले बरेच विद्यार्थीही जखमी झाले आहेत, त्यांनाही उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे. गेलेकाही वर्ष निसर्गाचा लहरीपणा दिसून येत आहे. यंदाही हाच लहरीपणा भारतीयांनी प्रकर्षाने अनुभवला. देशाच्या काही भागात तापमान वाढत असताना उत्तर भारतात अजुनही थंडीचा कहर सुरूच आहे. पावसाळ्यात पूर्वी पाऊस चांगलाच लांबला. त्यानंतर दमदार आमगन करीत शेतकऱ्यांसह साऱ्यांनाच जेरीस आणले. फेब्रुवारीमहिन्यातच कडक उन्हाळा जाणवू लागला आहे. त्यात होळी दरम्यान काही भागात उष्णतेच्या लाटेचा प्रभाव जाणवणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे सारेच चिंतेत आहेत.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा