वाशीम हादरले, अपहरण करून उपसरपंचाचा खून

0

मालेगाव तालुक्यातील थरारक घटना

वाशिम. जिल्ह्याच्या मालेगाव तालुक्यातील बोराळा (Borala in Malegaon Taluk ) येथील उपसरपंच विश्वास कांबळे यांचे चार चाकी वाहनातून अपहरण केल्यानंतर खून (Kidnapping murder of deputy sarpanch) करण्यात आल्याची घटना जऊळका पोलिस ठाण्याच्या (Jaulka Police Station) हद्दीत गुंज परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयीत आरोपींना अटक केली असून दोघांचा तपास सुरू आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पंचक्रोशीत एकच खळबळ उडाली असून सर्वत्र संताप व्यक्त होतो आहे. वेगवेगळे तर्त वितर्कही लावले जात आहे. विशेष म्हणजे कांबळे हे उपचारासाठी दवाखान्यात चालले होते. त्याचवेळी त्यांचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर आरोपींनी त्यांना गुंज फाट्यावर बेवारस सोडून पळ काढला. जिल्ह्यात सातत्याने गुन्हेगारी स्वरूपाच्या गंभीर घटना उघडकीस येत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
उपसरपंच विश्वास कांबळे हे शनिवारी उपचारासाठी राजाकिन्ही येथील दवाखान्यात गेले होते. याच दरम्यान त्यांचे चारचाकी गाडी क्रमांक एम एच ४७ एन ०४३९ मधून भर दुपारी अपहरण करण्यात आले. त्यानंतर करून त्यांना जखमी करून वाटेतच बेवारस सोडून आरोपींनी पळ काढला. याबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी पोलिसांनी चार संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून दोघांचा शोध पोलीस घेत आहेत. अशी माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी जगदीश पांडे यांनी दिली. राजा किन्ही हे वर्दळीचे गाव असून भर दुपारी अपहरण करून खून झाल्याने या घटनेमुळे जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
कांबळे यांच्या पत्नी लीलाबाई विश्वनाथ कांबळे यांनी पोलिसात पतीचा खून करण्यात आल्याची तक्रार दिली आहे. त्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पण, घटनेमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिसांकडूनही अधिक माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे. तपासात पुढे येणाऱ्या माहितीकडे साऱ्यांचेच लक्ष लागले आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा