तुमच्याकडे फाटकी नोट आहे काय?

0

ती बदलायची कशी, जाणून घ्या नियम

नवी दिल्ली. भारतीयांनी नोटा घडी घालून ठेवायची सवय आहे. शिवाय त्या कोंबून ठेवल्या जातात. त्यातून पुढे नोटा फाटतात. अशा जिर्ण नोटा (Damage Notes) चलनात आणताणाही अडचण होते. साऱ्यांकडूनच नोट घण्यास नकार मिळतो. अशा फाटक्या नोटांचे करायचे काय? हा प्रश्न पडतो. पण, अशा नोटा असतील तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. नोटा बदलून देण्यासंदर्भात (Exchange of Damage Notes) रिझर्व्ह बँकेचे (RBI) नियम आहेत. केंद्रीय बँकेने याविषयीचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार, फाटक्या नोटा बदलण्यासाठी एक निश्चित कालावधी असतो. एक व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलवू शकते. पण त्यांची एकूण किंमत 5 हजार रुपयांहून अधिक नको. तर पूर्णपणे जळालेली नोट, फाटक्या नोटा बदलविण्यात येणार नाही. या नोटा तुम्हाला थेट आरबीआयच्या इश्यू ऑफिसमध्ये जमा करता येतात.
नोटांच्या आकारानुसार परतावा
फाटक्या नोटा बदलविताना त्या किती जीर्ण, फाटक्या आहेत, त्यावर रक्कम निश्चित करण्यात येते. 2000 रुपयांची नोट 88 वर्ग सेंटीमीटर असेल तर त्याची पूर्ण किंमत मिळते. तर 44 वर्ग सेंटीमीटर नोट असेल तर अर्धी रक्कम देण्यात येते. जर 200 रुपयांच्या फाटक्या नोटेचा 78 वर्ग सेंटीमीटर भाग सुरक्षित असेल तर पूर्ण पैसे मिळतील. पण नोट 39 वर्ग सेंटीमीटर असेल तर अर्धीच रक्कम मिळेल. अन्य नोटांबाबतही निश्चित असा नियम आहे.
अर्धी नोटही चालेल
जर तुमच्याकडे 5, 10, 20 अथवा 50 रुपयांच्या फटक्या नोटा असतील. तर या नोटांचा अर्धा हिस्सा तरी असणे आवश्यक आहे. जर असे झाले नाही तर तुम्ही नोट बदलू शकत नाही. पण, फाटक्या नोटांची संख्या 20 हून अधिक असतील आणि त्यांचे मूल्य 5 हजार रुपयांपेक्षा अधिका असेल तर तुम्हाला या नोटा बदलण्यासाठी काही शुल्क जमा करावे लागेल. जर तुमच्याकडे नोटांचे अनेक तुकडे असतील तर त्यांना ही नोट बदलता येतात. अर्थात या नोटा बदलण्याची प्रक्रिया थोडी कठिण आहे. या नोटांना रिझर्व्ह बँककडे पोस्टामार्फत पाठवू शकता. त्यासोबत तुमचे बँक खाते क्रमांक, खात्याचे नाव, आयएफएससी कोडची माहिती द्यावी लागेल.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा