मुंबईः उद्धव ठाकरे गटाच्या माध्यमातून महाविकास आघाडीत प्रवेश मिळविण्याचे वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र, या प्रयत्नांना यश येत नसून काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून दखल देखील घेतली जात नसल्याचे दिसत आहे. अशातच उद्धव ठाकरे गटालाही धक्के बसत असल्याने वंचित बहुजन आघाडी ठाकरे गटाची साथ सोडणार की काय, असा (Vanchit Bahujan Aghadi Leader Prakash Ambedkar) प्रश्न उपस्थित झाला आहे. काँग्रेस व राष्ट्रवादीकडून विचार न झाल्यास काय, असा प्रश्न प्रकाश आंबेडकरांना विचारण्यात आला असता त्यांनी “आम्ही पुन्हा एकटे…” असे उत्तर त्यांनी दिले आहे. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरेंना धक्यावर धक्के बसत आहेत. अशातच आणखी एक धक्का बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे. वंचित बहुजन आघाडी ठाकरेंची साथ सोडणार या चर्चेला राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे. ठाकरे गटाने राष्ट्रवादी व काँग्रेससोबतच जाण्याचा निर्णय घेतल्यास आपण पुन्हा एकटे लढू, असे स्पष्ट संकेत आंबेडकर यांनी दिलेत. कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीतच काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी वंचित बहुजन आघाडीची साधी दखलही घेतलेली नाही. प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याच्या तयारीत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन पक्षांकडून त्यांना विनंतीदेखील करण्यात आलेली नसल्याचे बोलले जात आहे. तर दुसरीकडे आम्हाला वंचित बहुजन आघाडीची गरज नसल्याचे वक्तव्य काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केले असल्याने आता आंबेडकर पुन्हा एकला चलो रे च्या तयारीत असल्याचे बोलले जात आहे.
“तर पुन्हा आम्ही एकटे लढू..” प्रकाश आंबेडकर
शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा