6 Industrialistsदेशातील श्रीमंतांच्या यादीत नागपूरचे 6 उद्योगपती

0
30,600 कोटींची आहे संपत्ती : हल्दीराम समूहाचे 4 संचालक
नागपूर. देशातील सर्वात श्रीमंत पहिल्या 1000 उद्योजकांच्या यादीत शहरातील 6 उद्योगपतींचा समावेश (6 industrialists from the city included in the list of richest entrepreneurs) असल्याचे एका खासगी कंपनीकडून राष्ट्रीय स्तरावर करण्यात आलेल्या सर्वेक्षणानुसार पुढे आले आहे. यात सोलर इंडस्ट्रीज इंडिया केमिकल्स अॅण्ड पेट्रो केमिकल्सचे संचालक सत्यनारायण नुवाल यांना 120 वे मानांकन मिळाले आहे. हल्दीराम फूड् इंटरनॅशनल फूड अॅण्ड बेवरेजचे राजेंद्रकुमार अग्रवाल यांना यादीत 327 वे स्थान मिळाले आहे. तर याच ग्रुपचे कमलकुमार अग्रवाल, शिवकिशन अग्रवाल आणि सुशीलकुमार अग्रवाल यांना क्रमश: 411वे, 451 वे आणि 598 वे स्थान प्राप्त झाले. जायस्वाल निको इंडस्ट्रीजचे संचालक बसंतलाल शॉ 987 व्या स्थानावर आहे. त्रिशूर, सूरत, कोयम्बतूरनंतर या यादीत नागपूर आणि औरंगाबादचा (Nagpur and Aurangabad) नंबर लागतो. नागपूरच्या या उद्योगपतींकडे 30,600 कोटी रुपयांची संपत्ती असल्याची पुष्टी झाली आहे. यात हल्दीराम ग्रुपच्या 4 संचालकांचा समावेश आहे.
देशातील श्रीमंतांच्या 6 उद्योगपतींचा समावेश ही नागपूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. नागपुरातील अस्तित्वातील प्रस्तापित उद्योडकांना चालना मिळते आहे. त्याचवेळी नवीन उद्योजक मात्र इथे येण्यास तयार नाहीत, ही युवा पिढीसाठी काहीशी चिंतेची बाब आहे. शासनाकडून नागपूरसह विदर्भात उद्योग यावेत यासाठी प्रयत्न केला जात आहेत. पण, त्याला यश येताना मात्र दिसत नाही. इथे येण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या उद्योजकांनी यापूर्वीच काढता पय घातला आहे. त्यावरून राज्याच्या राजकीय वर्तूळीत चर्चाही सुरू आहे. पण, चर्चांपेक्षा नवीन उद्योग यावेत, त्यांना चालना मिळावी, रोजगार वाढून युवकांच्या हाताला काम मिळावे अशी नागपूरकरांची अपेक्षा आहे.

शहरासाठी अभिमानाची बाब
आतापर्यंत श्रीमंतांच्या यादीत दिल्ली, मुंबई, अहमदाबादचा दबदबा राहात होता. या यादीत आता नागपूरच्या उद्योगपतींचा समावेश होणे, ही शहरासाठी अभिमानाची बाब आहे. देशात 1,036 सर्वात श्रीमंत लोकांचे नाव यादीत समाविष्ट करण्यात आले आहे. यात गौतम अदानी पहिल्या, मुकेश अंबानी दुसऱ्या तर सायरस पुणेवाला तिसऱ्या स्थानावर आहे. इतरांमध्ये शिव नाडर, राधाकिशन दमानी, विनोद अदानी, एसपी हिंदुजा, एलएन मित्तल यांचासुद्धा समावेश आहे.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा