पहिल्याच दिवशी 7 मोर्चे धडकणार

0

प्रशासन सज्ज : आढवडाभरात 34 संघटनांची धडक

नागपूर. संत्रानगरित होणारे विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन आणि धरणे मंडप, मोर्चाचे अतूट असे नाते आहे. यंदाही अधिवेशन काळात नागपुरात मोठ्या प्रमाणावर मोर्चे निघणार आहेत. मोर्चेकरी व धरणे देणाऱ्यांसाठी यशवंत स्टेडियम महत्त्वाचे ठिकाण ठरणार आहे. पहिल्याच दिवशी 7 मोर्चे विधान भवनावर धडकतील. राष्ट्रवादी काँग्रेस, विदर्भ राज्य आंदोलन समिती, विदर्भ विकलांग संघर्ष समिती आणि आशा गटप्रवर्तकांचा मोर्चा यावेळी लक्षवेधी ठरण्याची चिन्हे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शेतकऱ्यांच्या समस्यांसह अन्य मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम येथून भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या युवा आघाडीतर्फे वेगळ्या विदर्भ राज्याची निर्मिती, वीजेचे दर निम्मे करावे यासह अन्य मागण्यांसाठी यशवंत स्टेडियम येथून मोर्चा निघेल.दरवर्षी विदर्भ विकलांग संघर्ष समितीचा मोर्च प्रशासनाला घाम फोडणारा ठरतो. समितीतर्फे यंदाही पहिल्याच दिवशी मोर्चा काढण्यात येणार आहे. भांडे प्लॉट त्रिकोणी मैदान येथून मोर्चा रवाना होईल. संजय गांधी निराधार योजनेची पेंशन सानुग्रह अनुदान भत्यासह 3 हजार व्हावी, सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता वाढ करण्यात यावा आदी मागण्या दिव्यांग बांधव यानिमित्ताने करणार आहेत.


धनगर समाज युवा मल्हार सेनेतर्फे मेंढपाळांशी संबंधित प्रश्नांबाबत यशवंत स्टेडियम येथून मोर्चा निघणार असून चारा क्षेत्र उपलब्ध करून देणे, मेढपाळ व मेंढ्यांना विमा सुरक्षा देणे, मेंढपाळांचे मुलामुलींना वसतिगृह उपलब्ध करून देणे आदी मागण्या करण्यात येतील. आशा गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे (सीआयटीयू) किमान वेतन व शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा यासह अन्य मागण्यांसाठी स्टेडियम येथून मोर्चा निघेल. शहर विकास मंचातर्फे झोपडपट्टीवासीयांच्या प्रलंबित मागण्यांसाठी यंशवंत स्टेडियम येथून मोर्चा निघेल. लोकाधिकार परिषद अजनी रेल्वे गेट येथून मैत्रय उद्योग समूहातील गुंतवणूकदार व प्रतिनिधींना न्याय मिळावा या मागणीसाठी यशवंत स्टेडियम येथून मोर्चा काढण्यात येणार आहे.


20 डिसेंबरला 5 मोर्चे


डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन परिसर अंबाझरी बचाव कृती समितीतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणीच्या मागणीसाठी मोर्चा, पोलिस बॉईज असोसिएशन, महाराष्ट्र शाहीर परिषद, जय संघर्ष वानहचालक सामाजिक संस्था, श्री सेवा अपंग बहु शिक्षण व सामाजिक संस्थेतर्फे मोर्चा काढण्यात येणार आहे.


21 डिसेंबरला 8 मोर्चे


गोंडवाणा गणतंत्र पार्टी, महाराष्ट्र राज्य पोलिस पाटील कृती समिती, स्वतंत्र मजदूर युनियन, स्वतंत्र मजदूर युनियन, हिंदू जनजागृती समिती, संघर्ष वाहन चालक-मालक संघटना, राष्ट्र निर्माण संघटना, महाराष्ट्र राज्य ग्राम पंचायत कर्मचारी निवृ्त वेतन संघटना


22 डिसेंबरला 7 मोर्चे


ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहादूल मुस्लेमीन (एआयएमआयएम), विदर्भ मोलकरीण संघटना, सर्व श्रमिक संघटना मुंबई, महाराष्ट्र साप्ताहिक ग्रामीण पत्रकार परिषद, महाराष्ट्र मुस्लिम शाह फकिर समाज संघटना, महाराष्ट् कलार समाज बुलडाणा, भूमी हक्क परिषद.


23 डिसेंबरला 7 मोर्चे


आम आदमी पार्टी, समग्र शिक्षा करार कर्मचारी संघटना, बहुजन समाज पक्ष, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पक्ष, राष्ट्रीय टॅक्सीचालक मालक संघटना, शिंपी समाज संघर्ष समिती आदी
धरणे पेंडॉल यशवंत स्टेडियममध्येच
दरवर्षी लक्षवेधी ठरणारे धरणे मंडप यंदाही यशवंत स्टेडियमच्या आतच असणार आहे. मेट्रोमुळे हा बदल आता नेहमीचाच असणार आहे .यामुळे मोर्चा व आंदोलनकर्त्यांसाठी अधिवेशनकाळात हे खऱ्या अर्थाने प्रेरणास्थळ ठरणार आहे. पहिल्या दिवशी बहुजन एम्प्लॉईज फेडरेशन ऑफ इंडियातर्फे अकोला महानगर पालिकेतील बडतर्फ शिक्षक कर्मचाऱ्यांना परत कामावर रुजू करण्याची मागणी करण्यात येईल. आदिवासी संशोधक विद्यार्थी कृती समिती उच्च शिक्षण, पीएचडीच्याउमेदवारांना आर्थिक मदत द्यावी या मागणीसाठी साखळी उपोषण. वंचित बहुजन आघाडीतर्फे 19 पासून अधिवेशन संपेपर्यंत गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळाने 19.54 लाख बारदाने परत करावे, यासह अन्य मागण्या लावून धरण्यात येतील. याशिवाय पुढच्या टप्प्यात आदिवासी कृती सामाजिक समन्वय संस्था, भारतीय वन कामगार सेना, वन सामाजिक वनिकरण व वनविकास महामंडळ, तांत्रिक अॅप्रेंटीस, कंत्राटी कामगार असोसिएशन, तांत्रिक कामगार युनियन आपल्या विविध मागण्यांसाठी आवाज बुलंद करणार आहे .