

समर्थभक्त श्री रवींद्र पाठक पुरस्काराचे मानकरी
नागपूर (Nagpur), दि. ५ जून :
छत्रपती सेवा प्रतिष्ठान, नागपूरच्यावतीने ४४ वा ‘जिजामाता विद्वत गौरव पुरस्कार’ वितरण सोहळा शिवराज्याभिषेक उत्सवानिमित्त शनिवार, ६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता काळे सभागृह, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटीक्स ॲड इकॉनॉमिक्स परिसर, पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.
पुण्याचे समर्थभक्त श्री रवींद्र पाठक यांना हा पुरस्कार प्रदान केला जाणार असून ५१ हजार रुपये रोख, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अखिल. भारतीय त्रिपदी परिवार, इंदौरचे अध्यक्ष प. पू. बाबामहाराज तराणेकर प्रमुख अतिथी म्हणून श्री समर्थ रामदास स्वामी मठ, खातगावचे मठपती समर्थभक्त श्री मोहनबुवा रामदासी, तसेच विशेष अतिथी म्हणून खासदार डॉ. मेधा कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.
Related posts:
जामसांवली धाम में उमड़ा आस्था का सैलाब, पुरुषोत्तम मास के तृतीय शनिवार पर 1 लाख से अधिक श्रद्धालुओं ...
June 7, 2026Hindi News
जागतिक पर्यावरण दिनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय पर्यावरण संवर्धन अभियान २०२६ चा भव्य शुभारंभ
June 6, 2026Artical Blog
प्रभावी नियोजन व योजनांच्या परिणामकारक अंमलबजावणीमुळे
June 6, 2026MAHARASHTRA


















