
जळगाव JALGAW – जामनेर येथे Akhil Bharatiya Vidyarthi Parishad अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे 777 फूट लांबीची तिरंगा पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी केले. प्रारंभी भारतमातेचे प्रतिमा पूजन तिरंगा फडकवत करण्यात आले. यावेळी ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन या तिरंगा यात्रेमध्ये सहभागी झाले होते. ही तिरंगा पदयात्रा जळगाव रोड धारिवाल कॉलेजपासून ते गांधी चौकपर्यंत काढण्यात आली. पदयात्रेचा समारोप गांधीचौकात राष्ट्रगीत गाऊन करण्यात आला. तिरंगा पद यात्रेमध्ये शहरातील विविध शाळा महाविद्यालयातील हजारो विद्यार्थी व नागरिक सामील झाले.
Related posts:
डॉ. हेमंत शरद पांडे को ‘डिजिटल ट्रांसफॉर्मेशन लीडर ऑफ द ईयर’ अवार्ड
May 30, 2026Artical Blog
धरमपेठ में रुका सड़क सौंदर्यीकरण कार्य फिर हुआ शुरू, नागरिकों और जनप्रतिनिधियों की पहल रंग लाई
May 30, 2026Artical Blog
ग्रामविकास पुरस्काराच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला मिळेल नवी ऊर्जा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
May 30, 2026Artical Blog
















