नवी दिल्लीः इंग्लंडने रविवारी अंतिम सामन्यात पाकिस्तानवर पाच गडी राखून मात करत दुसऱ्यांदा टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावले. मात्र, या स्पर्धेच्या सेमिफायनलमध्ये भारत पराभूत झाल्यावर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी भारताला डिवचणारे ट्विट केले होते.“या रविवारी (१३ नोव्हेंबर रोजी) १५२/० विरुद्ध १७०/० असा सामना होणार आहे,” असे ट्वीट करून शरीफ यांनी भारताच्या जखमांवर मिठ चोळण्याचा प्रयत्न केला होता. त्यावर पंतप्रधान शरीफ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोलही झाले. आता पाकिस्तानच्या पराभवानंतर भारतातूनही शरीफ मोठ्या प्रमाणात ट्रोल होत आहेत. अशातच भारतीय लष्कराचे निवृत्त लेफ्टनंट जनरल (Kanwaljit Singh Dhillo) कंवलजीतसिंग ढिल्लो यांनी “९३ हजार विरुद्ध शून्य हा अजूनही अभेद्य स्कोअर आहे, जय हिंद” अशा अर्थाचे ट्वीट केले आहे. (India’s befitting reply on Pakistan PM Twits)
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या या ट्वीटला पाकिस्तान विरुद्ध इंग्लंड दरम्यानच्या अंतिम सामन्याचा निकाल लागल्यानंतर म्हणजेच रविवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास लेफ्टनंट जनरल (निवृत्त) कंवलजीतसिंग ढिल्लो यांनी भन्नाट उत्तर दिले आहे. बांगलादेश युद्धामध्ये पाकिस्तानला अत्यंत लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला होता. त्या युद्धात पाकिस्तानच्या ९३ हजार शरणागती पत्करली होती. आजही पाकिस्तानचे राजकीय नेते तसेच लष्करी अधिकारी त्या पराभवाच्या आठवणीने अस्वस्थ होतात. त्याचाच हा संदर्भ ढिल्लो यांनी दिला आहे. विशेष म्हणजे भारतीय लष्कराशी संबंधित इतर अधिकाऱ्यांनीही या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना ढिल्लो यांचे समर्थन केले आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांना भारताकडून दिलेले सर्वात योग्य उत्तर असे याला म्हटले जात आहे.
*तो विनयभंग कसा? आमदार आव्हाडांनी राजीनामा देऊ नये-खासदार सुप्रिया सुळे*