कुजलेल्या अवस्थेत आढळून आला बिबट्याचा मृतदेह

0

बुलढाणा : बुलढाणा शहरातील शांतीनगरच्या मागील भागात असलेल्या खोऱ्यात बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत ८ मे रोजी मृतदेह आढळून आला.या बिबट्याचा मृत्यू कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झाले नाही..शहरालगतच्या भागात ही घटना घडल्याने याबाबत गूढ वाढले आहे.बुलढाणा शहरातील शांतीनगरच्या मागील भागात बुलडाणा वनपरिक्षेत्रातील हनवतखेड बीट मधील कंपार्टमेंट क्रमांक 522 भागातील खोऱ्यात गस्तीवर असलेल्या वनरक्षक दीपक घोरपडे यांना बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह दिसून आला.त्यांनी वरिष्ठांना त्याची माहिती दिली. या घटने प्रकरणी वन गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू असल्याची माहिती बुलढाणा आरएफओ अभिजीत ठाकरे यांनी दिली.