
(Pune)पुणे : पुण्यात राष्ट्रीय तपास यंत्रणा एनआयए ने कोंढवा परिसरातून एका डॉक्टरला अटक केली आहे. या डॉक्टरवर आयएसआयएस संघटनेतील भरतीची जबाबदारी होती, अशी माहिती मिळत आहे. (Adnali Sarkar)अदनाली सरकार असे आरोपी डॉक्टरचे नाव आहे. गेल्या अनेक वर्षापासून त्याच्याकडे तरुणांना आयएसआयएस मध्ये भरती करण्याची जबाबदारी होती, असे तपासात आढळून आले आहे.
एनआयए च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सरकार याच्या घरातून आयएसआयएस संदर्भात अनेक कागदपत्र सापडली आहेत. काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील सापडली असून तरुणांना दहशतवादी संघटनेमध्ये सहभागी करून त्यांचे ब्रेन स्टॉर्मिंग केले जात होते. आयसीसचे मॉडेल लोकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारीही त्याच्याकडे होती. याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने मुंबईतून तीन आणि ठाण्यातून एका जणाला अटक केलेली आहे.