24 तासात 142mm पाऊस,जिल्हा कृषी अधीक्षक यांनी तात्काळ नुकसान भागात दिले भेट आणि सर्वेक्षणाचे दिले आदेश
(Nagpur)नागपूर जिल्हातील व (Parashivani)पारशिवनी तालुक्यातील (Khandala) खंडाळा घ भागात दिनांक 26/7/23 ला रात्री मोठे पाऊस आल्यामुळे सोयाबीन, कापूस,
तूर, धान व इतर पिकाचे नुकसान झाले आहे व सोबतच जमीन खरवडून गेली आहे. गेल्या 24 तासात 142 mm पाऊस झाल्याची सरकारी विभागात नोंद घेतली आहे. या अतिवृष्टी ची सूचना कृषी विभागाला देण्यात आलेली आहे. माहिती होताच जिल्ह्याचे कृषि अधीक्षक रवींद्र मनोहरे तात्काळ नुकसान ग्रस्त ठिकाणी स्वता जाऊन पाहणी केली आणि झालेल्या नुकसानाची सर्वेक्षण करून अहवाल तयार करण्याचे निर्देश कर्मचाऱ्यांना दिले आहे. या वेळी संजय सत्येकार शेतकरी नेते, (Suraj Shende)सुरज शेंडे तालुका कृषी अधिकारी,(Chetan Kumbhalkar Deputy Sarpanch)चेतन कुंभालकर उपसरपंच, (Krishi Mitra Praful Nagpure)कृषी मीत्र प्रफुल नागपुरे, (Vivekananda Shinde)विवेकानंद शिंदे कृषी सहायक व इतर शेतकरी सोबत होते.