अमरावतीतून तरूणीचे अपहरण करून अत्याचार

0

नागपूर, शेगावात लॉजवर लैंगिक शोषण ; परतताच नोंदविला गुन्हाअमरावती. जुन्या ओळखीचा फायदा घेत एका मध्यमवयीन व्यक्ती 18 वर्षांच्या तरुणीला सोबत घेऊन गेला. मदतीचा देखावाकरीत तो तिला नागपूरला (Nagpur) घेऊन आला. तिथे एका लॉजमध्ये बळजबरीने अत्याचार (Forced rape in the lodge) केला. तिथून पुढे शेगावला (Shegaon) घेऊन गेला. सोबत लग्न करण्याचे आमिष दाखवत पुन्हा अत्याचार केला. शनिवारी ती घरी परतल्यानंतर झाल्या प्रकाराची कुटुंबीयांना माहिती दिली. त्यानंतर दत्तापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. त्या आधारे पोलिसांनी अपहरणासह अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. गणेश ढोके (42) रा. जुने धामणगाव असे आरोपीचे नाव आहे. शनिवारी ही घटना समोर आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली असून समाजमन क्षुब्ध झाले आहे. आरोपीविरोधात संतापाची लाट उसळली असून पोलिसांकडून सावध पावले उचलली जात आहेत. या प्रकरणात पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडिता व आरोपी यांच्यात जुनी ओळख आहे. पीडितेला दोघांच्याही परिचयातील शुभम वानखडे नावाचा युवक त्रास देत होता. तिने वयाने ज्येष्ठ असलेल्या गणेशची मदत घेण्याचे ठरविले. ठरल्याप्रमाणे गणेशकडे त्रासाची वाच्यता करीत शुभमची समजूत काढण्याची विनंती केली. गणेशनेही आडेवेडे न घेत त्याला समजावून सांगीतले. त्यानंतर शुभम वानखडेकडून होत असलेला त्रास थांबला. या मदतीनंतर पीडिता व गणेश यांच्यात बोलणे वाढले. दरम्यान, ७ डिसेंबर रोजी दुपारी त्याने तिच्यासोबत बोलणी केली. शुभम वानखडेबद्दल काही बोलायचे असल्याचे सांगून तो तिला दुचाकीवर बसवून नागपूर येथे घेऊन आला. तेथे लॉजवर थांबून तिचेसोबत जबरदस्तीने अत्याचार केला. एकटी असल्याने तिचा विरोध फारकाळ टिकू शकला नाही. शिवाय अनोळखी ठिकाण असल्याने तिला मदतही मिळू शकली नाही. तेथून पुढे पुलगाव येथे येऊन गेला. तिथून शेगावला नेले. तेथील लॉजवर नेऊन तिला लग्नाचे आमिष दिले आणि पुन्हा अत्याचार केला. ७ डिसेंबर ते ९ डिसेंबर या कालावधीत तो घटनाक्रम घडला. त्यानंतर तिला सोडून दिले होते.

    शंखनाद युट्युब चॅनेलच्या बातम्या बघण्यासाठी → येथे क्लिक करा