Home LOCAL NEWS नागपूर जिल्हा तांत्रिक प्रदर्शनात अभियांत्रिकी व नवकल्पनांचा भव्य जलवा

नागपूर जिल्हा तांत्रिक प्रदर्शनात अभियांत्रिकी व नवकल्पनांचा भव्य जलवा

0

नागपूर: जिल्ह्यातील कौशल्याधारित शिक्षण, अभियांत्रिकी कल्पकता आणि विद्यार्थ्यांच्या नवकल्पनांना व्यासपीठ देणाऱ्या जिल्हा स्तरीय तांत्रिक प्रदर्शनाचे आयोजन दि. 23 जानेवारी 2026 रोजी संत जगनाडे महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नागपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडले.

या प्रदर्शनात नागपूर जिल्ह्यातील 14 तालुक्यांमधील शासकीय ITI, खाजगी ITI, द्विलक्षी अभ्यासक्रम व M.C.V.C. संस्थांमधून तालुका स्तरावर प्रथम क्रमांक मिळवलेले विद्यार्थ्यांनी साकारलेले उत्कृष्ट तीन मॉडेल्स असे एकूण 42 मॉडेल्स सहभागी झाले होते.विद्यार्थ्यांच्या तांत्रिक कौशल्याचा, सर्जनशीलतेचा आणि समस्या-आधारित दृष्टिकोनाचा यामध्ये प्रभावी प्रत्यय आला.

अभियांत्रिकी विभागातील विजेते प्रकल्प

1)इलेक्ट्रिकल व्हेईकल वायरलेस चार्जिंग स्टेशन – गव्हर्नमेंट ITI, उमरेड
2)इंजेक्शन मोल्डिंग मशीन – गव्हर्नमेंट ITI, नागपूर
3)ऑटोमॅटिक फायर एक्सटिंग्विशर – गव्हर्नमेंट ITI, नागपूर.

नॉन-इंजिनिअरिंग गटातील विजेते प्रकल्प

1)मूर्ती – संत जगनाडे महाराज (पेंटर ट्रेड) – नागपूर
2)स्मार्ट मोबाइल बेस्ड स्किन अ‍ॅनालिसिस अ‍ॅण्ड रिकमेंडेशन सिस्टम – बेसिक कॉस्मेटोलॉजी, लेडीज ITI नागपूर
3)नेल आर्ट झिरो वेस्ट – बेसिक कॉस्मेटोलॉजी, मुलींची ITI नागपूर.

नवकल्पना विभागातील विजेते प्रकल्प

1)सर्व्हिस रोबोट – गव्हर्नमेंट ITI नागपूर
2)रॅक अ‍ॅण्ड पिनियन – गव्हर्नमेंट ITI नागपूर
3)गॅस लीकेज डिटेक्टर – गव्हर्नमेंट ITI काटोल

प्रोत्साहन विभाग
अलुमनी वेबसाइट – गव्हर्नमेंट ITI नागपूर

या तांत्रिक प्रदर्शनाचे उद्घाटन नागपूर विभागीय प्रादेशिक कार्यालयाचे सहसंचालक मा. पी. टी. देवतळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे IMC अध्यक्ष मा. गिरीश देशमुख, नागपूर DVO मा. पी. जी. ठाकरे, कौशल्य, उद्योजकता व नावीन्यता विभागाचे मा. मंत्री लोढा साहेब यांचे स्वीय सहाय्यक मा. बोरसे, तसेच इंडस्ट्री प्रतिनिधी, अधिकारी, NIT इंजिनिअरिंग कॉलेजचे प्रा. कानोजिया, प्रा. दोडके व अन्य मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या उपसंचालिका सौं. श्वेता कुळकर्णी होत्या. याप्रसंगी मुलींच्या ITI चे प्राचार्य श्री. दिगंबर पुंड, रामटेक ITI चे श्री. आनंद वाळके यांनी उपस्थिती दर्शवली.

या प्रदर्शनाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या उपप्राचार्य श्रीमती किशोरी पंडिले, तंत्र प्रदर्शन समन्व्यक श्री. शिवाजी ढुमणे व श्री. सिद्धार्थ मेहरे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन श्री. साहेबराव गुडधे व श्री. गणेश बांते यांनी केले, तर आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा बांद्रे यांनी केले.संस्थेचे गटनिदेशक श्री. टालाटुले, श्री. केणे, श्री. दुबे, श्री. वाढई, तसेच सर्व शिल्पनिदेशक व कर्मचारी वृंद यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाला.जिल्ह्यातून आलेले अधिकारी, निदेशक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ही तांत्रिक प्रदर्शनी विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला, नवकल्पनांना आणि उद्योजकतेला चालना देणारी ठरली, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.