बापाचा मृत्यू कामगारांच्या डोळ्यादेखत घटना ; पिंपळगावातील घटना
बुलढाणा. – (Buldana )आज ना उद्या घरचे लग्न करून देतील या विश्वासाने मुलगा दिवस ढकलत होता. अगदी चाळीशी गाठली तरी घरचे काही मनावर घेतच नव्हते. अखेर त्याने स्वतःहूनच लग्नाचा विषय सुरू केला. पण, बापाकडून सकारात्मक प्रतिसादच मिळत नव्हता. वर्षभरापासून तो स्वतःच्या लग्नाचा विषय जोरकसपणे मांडत होता. पण, काही केल्या बाप लक्ष देईच ना. यामुळे मुलगा चिडला होता. कामाच्या ठिकाणीच बाप -लेकात याच विषयावरून वाद सुरू झाला. मुलाने संतापाच्या भरात बापाच्या डोक्यात काठी हाणली (son hit the father with a stick). वर्मी घव बसल्याने वडिलांचा तडफडून मृत्यू झाला (Father died). बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव (Pimpalgaon in Jalgaon Jamod Taluka of Buldana District ) याठिकाणी ही दुर्दैवी आणि तितकीच संतापजनक घडली आहे. मुलाकडून वडिलांच्या झालेल्या खूनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. जामोद पोलिसांनी आरोपी मुलाला अटक केली आहे.
नानसिंग भैरड्या असे मृत वडीलांचे तर भानसिंग भैरड्या असे आरोपी मुलाचे नाव आहे. जळगाव जामोद तालुक्यातील पिंपळगाव काळे येथून जवळ असलेल्या अडोळ फाट्यावर दोघे बाप -लेक वीटभट्टीवर कामाला होते. दोघेही कामात व्यस्त असताना अचानक लग्नाचा विषय निघाला. शब्दाला शब्द वाढत गेला. चर्चेचे रुपांतर वादात झाले. चाळीशीत पोहोचल्यानंतरही बाप आपले लग्न लावून देत नाही, असे म्हणत मुलाने जवळ पडलेली काठी उचलली आणि थेट वडिलांच्या डोक्यात मारली. उन्हाचा वाढलेला कडाका आणि डोक्यातून वाहणारे रक्त यामुळे बापाचा तडफडून मृत्यू झाला. अन्य सहकारी कामगारांच्या डोळ्यादेखतच ही घटना घडली. माहिती मिळताच जामोद पोलिस घटनास्थल पोहोचले. तिथूनच आरोपीला अटक करण्यात आली. घटनेमागील कारण ऐकून पोलिसही अवाक राहिले.
कामगारांनी दिलेल्या माहिती नुसार, मुलगा भानसिंग भैरड्या याचे वय सध्या 40 आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो वडील नानसिंग भैरड्या यांच्याकडे लग्न जमवण्याची मागणी करत होता. मात्र वडिल त्याच्याकडे दुर्लक्ष करत असल्याने तो संतापाने धुमसत होता. यातूनच ही घटना घडली. पण, वडिलांना मारून टाकण्याचे त्याच्या मनात नव्हते. रागाच्या भरात त्याने काठी हाणली आणि वडिलांचा मृत्यू झाला.