Home Top News मोठ्या प्रमाणात आमदार महायुतीच्या सरकारमध्ये येतील – खा. श्रीकांत शिंदे

मोठ्या प्रमाणात आमदार महायुतीच्या सरकारमध्ये येतील – खा. श्रीकांत शिंदे

0

 

छत्रपती संभाजीनगर- राष्ट्रवादीचे आमदार आमच्यासोबत येणार आहेत. हे आम्ही तुम्हाला अगोदरच सांगितलं तर महत्त्व राहणार नाही. पत्रकारांना सरप्राईज पाहिजे. मोठ्या प्रमाणात आमदार महायुतीच्या सरकारमध्ये येतील याची बातमी लवकरच मिळेल असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केला आहे.
शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन झालेलं आहे. यामुळे कोणाची पीछेहाट झाली नाही. हे तिघे एकत्र आल्यामुळे सरकार मजबूत झालं आहे. माझ्या मतदार संघाची काळजी तुम्ही करू नका. शिवसेनेचे 13 खासदार शिंदे यांच्यासोबत आहेत. राष्ट्रवादी आणि भाजपाचे खासदार होत आहेत. शिवसेना आणि भाजपा यांचा पक्ष डॉमिनंट आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन वरिष्ठ बसून निर्णय घेतील यामध्ये माझं काय आणि तुझं काय हे होणार नाही. सर्वजण एकत्र यासाठी आहोत की, महाराष्ट्रामध्ये चांगले काम होईल महाराष्ट्राचा विकास होईल या उद्देशाने राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप एकत्र मिळून काम करत आहोत यावर शिंदे यांनी भर दिला.