
मुंबई-उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्री बंगल्यावर रविवारी एक किंग कोब्रा हा विषारी साप आढळून आल्याने (King Cobra found in Matoshree Bungalow) काही काळ खळबळ माजली होती. बंगल्यावर कर्मचाऱ्यांना हा कोब्रा दिसल्यावर वन्यजीव संरक्षण पथकाला माहिती देण्यात आली व त्यांनी सापाला पकडून जंगलात सोडले. सापाला पकडण्यात येत असताना उद्धव ठाकरे व तेजस ठाकरे हे पिता-पुत्र तेथे हजर होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मातोश्री बंगल्यावरील पाण्याच्या टाकीमागे हा किंग कोब्रा लपलेला होता. कर्मचाऱ्यांना हा प्रकार लक्षात आला. माहिती मिळताच उद्धव ठाकरे आणि तेजस ठाकरे तेथे पोहोचले. वन्यजीव संरक्षण पथकाला बोलावण्यात आले व पथकाने लगेच सापाला पकडले. यावेळी उद्धव ठाकरे व तेजस ठाकरेही तेथेच उपस्थित होते. सापाला नंतर जंगलात सोडण्यात आले.
विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी खासदार संजय राऊत यांच्या भांडूपमधील घरातही अचानक साप निघाला होता.